Pat Cummins on Team India : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक 2023 फायनलपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला त्याच्या संघासाठी धोका असल्याचे म्हटले आहे. 6 डावात 23 विकेट्स घेऊन शमी विकेट घेण्याच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. कमिन्सने अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली.






यजमानांबद्दल कमिन्स म्हणाले, "भारतही एक चांगला संघ आहे. मोहम्मद शमी हा एक मोठा धोका आहे." 150,000 क्षमतेच्या स्टेडियममधील गर्दीच्या दबावाबद्दल बोलताना, कमिन्स म्हणाला की खेळात घरच्या संघाला पाठिंबा मिळणे काही नवीन नाही. पण विरोधी संघ असल्याने तुमच्या खेळाने स्टेडियममध्ये शांतता निर्माण करण्यापेक्षा आनंददायी आणि समाधानकारक काहीही असू शकत नाही. हे आमचे ध्येय असणार आहे.






पॅट कमिन्स पुढे म्हणाला की, आम्ही भारतीय भूमीवर भरपूर क्रिकेट खेळतो, उदाहरणार्थ 1 लाख 32 हजार प्रेक्षकांसमोर खेळणे ही नवीन भावना नाही. परंतु या स्तरावर आपण यापूर्वी जे अनुभवले आहे त्यापेक्षा ते कदाचित खूप जास्त असेल यात शंका नाही. कांगारूंच्या कर्णधाराने सांगितले की, हा मोठा सामना असणार आहे. काही काळापूर्वी आम्ही सर्व मुले होतो, काही महान संघांना 1999, 2003, 2007 विश्वचषक चॅम्पियन बनताना पाहिले.






त्याने सांगितले की, आमच्याकडे एक संधी आहे जी खरोखरच रोमांचक असणार आहे. कर्णधार म्हणून या अप्रतिम खेळाडूंसोबत ट्रॉफी उचलणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल. याआधी ऑस्ट्रेलियाने विश्वचषक 2015 चे विजेतेपद पटकावले होते. पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियन संघाचा एक भाग होता. मात्र, यावेळी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली कांगारू संघ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावण्यासाठी उतरणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरी गाठली, तर टीम इंडियाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला.






इतर महत्वाच्या बातम्या