PSG: फ्रेंच फुटबॉल लीगच्या सामन्यात रविवारी (6 नोव्हेंबर 2022) पॅरिस सेंट-जर्मेन (Paris Saint-Germain) आणि लॉरिएंट (Lorient) आमने सामने आला होता. या सामन्यात पॅरिस सेंट-जर्मेननं लॉरिएंटचा 2-1 असा पराभव केला. डिफेंडर डॅनिलो परेरानं (Danilo Pereira) शेवटच्या क्षणी विजयी गोल करत पॅरिस सेंट-जर्मेनच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह पॅरिस सेंट-जर्मेननं फ्रेंच फुटबॉल लीगमध्ये आपली मजबूत आघाडी कायम ठेवलीय.
ट्वीट-
पॅरिस सेंट-जर्मेन विजयात डॅनिलो परेराची महत्त्वाची भूमिका
पॅरिस सेंट-जर्मेन आणि लॉरिएंट यांच्यातील सामन्याच्या 81 व्या मिनिटाला नेमारच्या कॉर्नर किकवर परेराने हेडरवरून गोल केला. नेमारनं नवव्या मिनिटाला पीएसजीसाठी पहिला गोल केला. या विजयामुळं पीएसजीला दुसऱ्या स्थानावरील लेन्सपेक्षा पाच गुणांची आघाडी मिळाली.
लिओनेल मेस्सीला विश्रांती
लिओनेल मेस्सीच्या पायात दुखत असल्यानं त्याला या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. विश्वचषकाच्या तयारीत असलेला अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू पुढील आठवड्यापासून सरावाला सुरुवात करण्याची शक्यता आहे.
इतर संघाची परिस्थिती
फ्रेंच फुटबॉल लीगच्या इतर सामन्यांमध्ये, तिसऱ्या स्थानावर असलेल्या रेनेनं लिलीसोबत 1-1 अशी बरोबरी साधली. तर, चौथ्या स्थानावर असलेल्या मार्सेलीने ल्योनचा 1-0 असा पराभव केला.
हे देखील वाचा-