Vinesh Phogat Disqualified Paris Olympics 2024: भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश  फोगाटने(Vinesh Phogat) ऑलम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय ठरत 'खोटं नाणं' ठरवणाऱ्यांच्या तिनं मुसक्या आवळल्या खऱ्या. मात्र, आता ऑलम्पिकने अपात्र ठरल्यानंतर सारा भारत हळहळलाय. अपात्रतेच्या निर्णयामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे.  दरम्यान, विनेशच्या अपात्रतेनंतर सोशल मिडियावर कुस्ती खेळाडूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असणारे ब्रिजभूषण सिंह यांना टॅग करत नेटकऱ्यांनी लक्ष्य केलंय. 


विनेश फोगाटच्या अपात्रतेच्या निर्णयात ब्रिजभूषण यांचाच हात असल्याचे आरोप केले जात असून लैंगिक शोषणाच्या आरोपांकडे जसे दूर्लक्ष केले असे म्हणत हे मोठे कटकारस्थान असल्याच्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.


ऑलंम्पिकमधून अपात्र, रौप्य आणि कांस्य पदकासाठीही अपात्र


विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही.


X माध्यमावर काय येताहेत पोस्ट?


विनेशने अंतिम फेरी गाठल्यापासून x माध्यमावर विनेशच्या अभिमानास्पद कामगिरीच्या पोस्ट येत होत्या. यात विनेश फोगाटची कामगिरी ब्रिजभूषण सिंहांना उत्तर असल्याची चर्चा होती. आता ऑलम्पिकच्या अपात्रतेच्या निर्णयानंतर नेटकरी हळहळले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांचे हे कटकारस्थान असल्याच्या पोस्ट समोर येत असून नेटकऱ्यांनी #Brijbhushan करत चांगलाच निशाणा साधला आहे. काहींनी विनेशच्या अंतिम फेरीत जात ब्रिजभूषण यांना हारवल्याच्या पोस्ट करण्यात आल्या आहेत.






काहींनी लैंगिक शोषणाच्या आरोपादरम्यान झालेल्या आंदोलनाचे व्हिडिओ पोस्ट करत ब्रिजभूषण सिंह यांना ट्रोल केल्याचं दिसतंय.






 


विनेशच्या सासऱ्यांचेही ब्रिजभूषण सिंहांवर गंभीर आरोप


डोक्यावरील केसांमुळेही वजन १०० ग्रॅम वाढू शकते. याशिवाय त्यांनी सरकार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले. यात सरकार आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांचा हात असल्याचे ते म्हणाले. कुस्ती महासंघाने षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे.