मुंबईः रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताचं नाव अभिमानाने उंचावणारे मरियप्पन थंगवेलू, दीपा मलिक, वरुण सिंह भाटी आणि देवेंद्र झंझारिया हे खेळाडू कॉमेडीयन कपिल शर्माच्या शोमध्ये झळकणार आहेत.

सचिनकडून डीनरसाठी निमंत्रण

पॅरालिम्पिकच्या या चार खेळाडूंनी नुकतीच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली होती. खेळाडूंचा देशभरात विविध ठिकाणी गौरव केल्यानंतर मुंबईमध्येही गौरव केला जाणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या खेळाडूंना डीनरसाठी घरी येण्याचं निमंत्रण दिलं आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या चार खेळाडूंचा मुंबई दौरा सुरु होणार आहे. तसेच 6 ते 7 ऑक्टोबर दरम्यान कपिलच्या शोची शूटिंग होण्याची शक्यता आहे. कपिलच्या शोमध्ये जाण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं दीपा मलिकने सांगितलं.