भर मैदानातच भिडले दोन पाकिस्तानी क्रिकेटर!

Continues below advertisement
कराची: ब्रिसबेनमध्ये सराव सत्रात पाकिस्तानी खेळाडू वहाब रियाज आणि यासिर शाह हे मैदानाताच एकमेकांना भिडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हे प्रकरण पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड (पीसीबी)नं गंभीरपणे घेतलं आहे. पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी मीडियाला माहिती दिली की, फुटबॉल खेळत असताना झालेल्या घटनेनं मी खूपच निराश आहे. शहरयार म्हणाले की, 'मला माहित नाही की, नेमकं काय झालं. कारण की, आतापर्यंत पाकिस्तानी संघ शिस्तबद्ध आणि त्यांच्यात एकजूट  होती. पण मैदानावर जे काही झालं तो शिस्तबद्धपणा नाही. आम्ही या घटनेचा रिपोर्ट मागवला आहे.' या घटनेचा अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच जर यामध्ये खेळाडू दोषी अडकल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाईही करण्यात येईल असं शहरयार यांनी सांगितलं. दरम्यान, दोन पाकिस्तानी खेळाडू सरावादरम्यान मैदानातच भिडले होते. याचे फोटो आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये छापण्यात आले आहेत.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola