मुंबई : पाकिस्तानातील 'इंडिपेंडन्स कप' स्पर्धेनंतर दक्षिण आफ्रिकेला परतलेल्या फॅफ डू प्लेसिसने 'सुरक्षित मायदेशी परतलो' असं ट्वीट केलं आहे. मात्र या टोमण्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांचा तीळपापड झाला असून प्लेसिसला ट्विटरवर ट्रोल करण्यात येत आहे.

वर्ल्ड इलेव्हन टीमचा कर्णधार असलेला दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू फॅफ डू प्लेसिस 'इंडिपेंडन्स कप'च्या निमित्ताने पाकिस्तानातील लाहोरमध्ये होता. मायदेशी परतल्यानंतर फॅफ डूने ट्विटरवर 'घरी सुरक्षित परतलो. आदरातिथ्यासाठी पाकिस्तान आणि लाहोरचे आभार' असं लिहिलं.

https://twitter.com/faf1307/status/909353461225066497
पाकिस्तानचे आभार मानण्याचं सौजन्य फॅफ डूने दाखवलं असलं, तरी त्यातील 'सुरक्षित' हा शब्द पाकिस्तानी चाहत्यांना खटकला. हा शब्द जिव्हारी लागलेल्या फॅन्सनी लागलीच त्याला ट्विटरवर झोंबणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या.

'इथे 20 कोटी जनता सुरक्षित राहते आणि इथून सगळे सुरक्षितच जातात. तुझा जळफळाट होत असल्यास बर्नाल लावत जा' असं एकाने लिहिलं आहे.

https://twitter.com/0007IbrahimK/status/909367540199116800
'हे अत्यंत डिप्लोमॅटिक ट्वीट आहे. पण पाकिस्तानी डिप्लोमॅटिक नाहीत. पाकमध्ये आल्याबद्दल आभार' असं एकाने लिहिलं आहे.

https://twitter.com/syedarubab14/status/909418142920855552
टी 20 मालिकेत वर्ल्ड इलेव्हन संघाला पाकिस्तानने 2-1 ने धूळ चारली. लाहोरमधील गडाफी स्टेडिअमवर तिन्ही सामने खेळवण्यात आले होते.