बंगळुरु : दृष्टिहीनांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गतवेळच्या विजेत्या भारतासमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधली ही लढाई बंगळुरूमध्ये खेळवली जाणार आहे.


भारतानं शुक्रवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेवर दहा विकेट्स राखून मात केली होती. मग शनिवारच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्ताननं इंग्लंडचं आव्हान मोडून काढलं.

पाकिस्ताननं या सामन्यात या सामन्यात पाकिस्ताननं निर्धारित 20 षटकांत एक बाद 309 धावांचा डोंगर उभा केला. इसरार हसनच्या 143 आणि बाबर मुनीरच्या 103 धावांच्या खेळींच्या जोरावर पाकिस्ताननं ही मजल मारली.

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 20 षटकांत सात बाद 162 धावांवरच रोखलं आणि तब्बल  147 धावांनी विजय साजरा केला.

याआधी साखळी फेरीत झालेल्या लढतीतही पाकिस्ताननं भारताला सात विकेट्सनी हरवलं होतं. त्या पराभवाचा बदला घेऊन विजेतेपद कायम राखण्याचं आव्हान भारतीय संघासमोर आहे.