Babar Azam Champions Trophy 2025: येत्या 19 फ्रेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी भारताने आतापासूनच कंबर कसली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत पाकिस्तान संघाचाही समावेश असणार आहे. त्यामुळेच पाकिस्ताननेही या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी तयारी चालू केली आहे. पाकिस्तान संघाचा दिग्गज फलंदाज बाबर आझम यानेदेखील कसून सराव चालू केला आहे. असे असतानाच त्याच्याबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. एका विशेष बॅटने फलंदाजी केल्या 7 कोटी रुपये मिळणार आहेत. 


बाबर आझमने केला करार 


मिळालेल्या माहितीनुसार बाबर आझमने एक करार केला आहे. या करारानुसार या कंपनीच्या एका बॅटने फलंदाजी केल्यास त्याला एका वर्षाला सात कोटी रुपये मिळणार आहेत. प्रोपाकिस्तान या पाकिस्तानी वृत्तसंकेतस्थळानुसार बाबर आझमने करार केलेल्या कंपनीचे स्टिकर त्याच्या बॅटवर लावले जाईल. फलंदाजी करताना याच कंपनीचे स्टिकर असलेल्या बॅटने तो फलंदाजी करेल. यासाठी त्याला एका वर्षात तब्बल 7 कोटी रुपये मिळणार आहेत. याआधी बाबर आझमच्या बॅटला इंग्लंडची एक कंपनी स्पॉन्सर करायची. मात्र या कंपनीचा बाबर आझमसोबतचा करार संपुष्टात आला आहे. आता बाबर आझमने नव्याने करार केलेल्या कंपनीचे नाव सीए स्पोर्ट्स असे आहे. 


बाबरला मिळणार तब्बल सात कोटी रुपये


क्रिकेटपटून आपापल्या देशांकडून पैसे मिळतात.  सोबतच हे खेळाडू वेगवेगळ्या ब्रँड्सची जाहिरात करतात. त्यासाठीही त्यांना भरघोस पैसे दिले जातात. भारताचा विराट कोहली तर अनेक ब्रँड्सचे प्रमोशन करतो. विराट कोहली हा जाहिरातीतून सर्वाधिक पैसे मिळवणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. यामध्ये आता बाबर आझमचाही समावेश झाला आहे. त्याला सीए स्पोर्ट्स या कंपनीच्या बॅटने फलंदाजी केल्यामुळे तब्बल 7 कोटी रुपये मिळणार आहेत. 


भारत आणि पाकिस्तान 23 फ्रेब्रुवारीला भिडणार


दरम्यान, येत्या 19 फ्रेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने चालू होणार आहेत. या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्ता आणि न्यूझिलँड यांच्यात होणार आहे. हा सामना कराचीत होईल. तर पाकिस्तानचा दुसरा सामना भारताविरोधात असेल. हा सामना 23 फेब्रुवारी रोजी खेळवला जाईल. त्यामुळे या सामन्यांत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यासह चॅम्पियन्स ट्रॉफीत कोण जिंकणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


हेही वाचा :


IND vs ENG T20 live streaming : टेस्टनंतर आता टी-20 चा धमाका, भारत-इंग्लंड यांच्यातील सामने LIVE कुठे पाहता येणार? वाचा A टू Z माहिती!


Gautam Gambhir : गौतम गंभीरच्या मनासारखे झाले तर... 'हा' पठ्ठ्या होणार टीम इंडियाचा कर्णधार!