PAK vs NED 1st Innings Highlights : वर्ल्डकपच्या (ICC Cricket World Cup 2023) सलामीच्या सामन्यात अत्यंत सोपा असा पेपर असलेल्या पाकिस्तानला (Pakistan vs Netherlands) दुबळ्या असणाऱ्या तुलनेतील दुबळ्या असणाऱ्या नेदरलँडने (Netherlands) अक्षरशः घाम फोडला. नेदरलँडने केलेल्या भेदक गोलंदाजीने पाकिस्तानच्या कोणत्याही फलंदाजाला जग धरता आला नाही. त्यामुळे पाकिस्तानला (Pakistan) समोर दुबळा प्रतिस्पर्धी असूनही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पाकिस्तानला 49 षटकांत 286 धावांवर गुंडाळत नेदरलँडने दमदार कामगिरी केली. नेदरलँडकडून बॅस दे लीडेनं भेदक मारा करताना पाकिस्तानच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले. आर्यन दत्त, लाॅगन वॅन बीक, काॅलिन अॅकरमन आणि पाॅल वॅन मिकेरेने यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला 


मधल्या फळीतील मोहम्मद रिजवान आणि सौद शकीलने केलेल्या अर्धशतकीय खेळीनंतर पाकिस्तानच्या डावाला आकार आला. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केल्यामुळे पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. दोघांनी केलेल्या खेळीने पाकिस्तान मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत असतानाच  नेदरलँडच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा सामन्यांत रंगत निर्माण करत झटपट तीन गडी बाद करत पाकिस्तानची मधली फळी कापून काढली.


यामध्ये मोहम्मद रिजवान 68 धावांवर बाद झाला. सौद शकीलही 68 धावांवर बाद झाला. त्यानंतर इफ्तिकार अहमदही बाद झाल्याने पाकिस्तानची अवस्था 6 बाद 188 अशी झाली. यानंतर पाकिस्तान किमान सन्मानजनक धावसंख्या उभारतो की नाही? अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, मोहम्मद नवाज आणि शादाब खान यांनी केलेल्या छोटेखाली खेळीमुळे पाकिस्तानला कशीबशी अडीचशेपर्यंत मजल मारता आली. 


मात्र त्यानंतरही नेदरलँडने दोघांनाही झटपट बाद करत पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येपासून रोखलेय. नेदरलँडचा मारा सुरुवातीपासूनच संयमित राहिला. त्यामुळे एकंदरीत पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. नाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार बाबर आझम आम्ही 300च्या वर स्कोअर करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, एकंदरीतच पाकिस्तानची फलंदाजांची फळी नेदरलँडच्या गोलंदाजीसमोर कमजोर दिसून आली.


इतर महत्वाच्या बातम्या