लंडन : ज्यो रूटच्या इंग्लंडने ओव्हल कसोटीत टीम इंडियाला विजयासाठी 464 धावांचं भलंमोठं आव्हान दिलं असून, त्या आव्हानाच्या दडपणाखाली भारताची तीन बाद 58 अशी घसरगुंडी उडाली आहे.
जेम्स अँडरसनने शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा या दोघांना एकाच षटकात पायचीत केलं. मग स्टुअर्ट ब्रॉडने कर्णधार विराट कोहलीला भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था तीन बाद दोन अशी केविलवाणी झाली. त्यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेने भारताचा डाव तीन बाद 58 असा सावरून धरला आहे.
ज्यो रूट आणि अॅलिस्टर कूकने झळकावलेली वैयक्तिक शतकं, तसंच त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी रचलेली 259 धावांची भागीदारी यांच्या जोरावर इंग्लंडने ओव्हल कसोटीत आपला दुसरा डाव आठ बाद 423 धावसंख्येवर घोषित केला. त्यात पहिल्या डावातली 40 धावांची आघाडी जमेस धरून, इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 464 धावांचं आव्हान दिलं.
इंग्लंडच्या डावात रूटने 125 धावांची, तर कूकने 147 धावांची खेळी उभारली. कूकने अखेरच्या कसोटी डावात झळकावलेल्या शतकाचं टीम इंडियाने खिलाडूवृत्तीने कौतुक केलं. तो बाद होऊन माघारी परतत असताना कर्णधार विराट कोहलीने आणि त्याच्या शिलेदारांनी त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ओव्हलवर उपस्थित प्रेक्षकांनीही उभं राहून टाळ्यांच्या गजरात कूकला मानवंदना दिली.
464 धावांचं आव्हान असताना भारताची 3 बाद 58 अशी अवस्था
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Sep 2018 11:13 PM (IST)
ज्यो रूट आणि अॅलिस्टर कूकने झळकावलेली वैयक्तिक शतकं, तसंच त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी रचलेली 259 धावांची भागीदारी यांच्या जोरावर इंग्लंडने ओव्हल कसोटीत आपला दुसरा डाव आठ बाद 423 धावसंख्येवर घोषित केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -