विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरी जिंकत दुसर्‍या फेरीत पोहोचल्यानंतर सानियाने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यासह सर्व सेलेब्स तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.


या फोटोत सानियाचा मुलगा इझान स्माईल करताना दिसत आहे. तसेच सानिया आणि बेथानी मॅटेक सँड्ससुद्धा खूप आनंदात दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


भारतीय कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने या फोटोवर "खूपच सुंदर." अशी कमेंट केली आहे. अनुष्काशिवाय अभिनेत्री गौहर खान आणि गायक नीती मोहन यांच्यासह सर्व मोठ्या सेलिब्रिटी या फोटोवर कमेंट करून आपले प्रेम व्यक्त करत आहेत.






सानिया मिर्झाच्या या फोटोला तिचे चाहते खूप पसंती देत आहेत. बातमी लिहिण्यापर्यंत एक लाख 52 हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक्स केलं होतं. सोबतच कमेंटचाही पाऊस पडत आहे.