Nishad Kumar Wins Medal: भारताच्या निषाद कुमारने टोकियोमध्ये खेळल्या जाणाऱ्या पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. निषाद कुमारने टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये चमकदार कामगिरी करून देशाला आणखी एक पदक मिळवून दिले आहे. त्याने उंच उडीत रौप्य पदक जिंकलय. चमकदार प्रतिभेने समृद्ध असलेल्या निषाद कुमारने चमकदार कामगिरी करत पहिल्या 3 मध्ये पोहोचले होता. त्याची अमेरिकेतील 2 खेळाडूंशी स्पर्धा होती.


टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकणारा निषाद कुमार मूळचा हिमाचल प्रदेशातील उना येथील आहे. पॅरालिम्पिक खेळ सुरू होण्यापूर्वी त्याने बेंगळुरूच्या एका कोचिंग कॅम्पमध्ये अनेक महिने मेहनत घेतली. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी त्याच्या गावात त्याच्यासाठी सतत प्रार्थना केल्या जात होत्या. या पदकामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे.






पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियोमध्ये पुरुषांच्या उंच उडीमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल निषाद कुमार याचे ट्विट करून अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ते एक विलक्षण धावपटू आहेत, मला त्याबद्दल खूप आनंद आहे.