Tokyo Olympics 2020 LIVE : ऑलिम्पिकमधील आजच्या दिवसाची सुरुवात भारतासाठी सकारात्मक ठरली. भारतासाठी स्टार अॅथलीट नीरज चोप्रानं जेलवीन थ्रो म्हणजेच भालाफेक स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. नीरजनं भालाफेकमध्ये अंतिम सामन्यात जागा बनवली आहे. नीरज चोप्रासमोर फायनल्स गाठण्यासाठी 83.5 मीटरचं टार्गेट होतं. परंतु, नीरजनं 86.65 चा थ्रो करत फायनल्समध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. नीरज चोप्राकडून पदकाची अपेक्षा केली जात असून त्यानं क्वालिफाईंग राऊंडमध्येच आपलं लक्ष्य स्पष्ट केलं आहे. क्वालिफाइंग राउंडच्या ग्रुप ए मध्ये नीरज चोप्रा टॉपवर आहे.
महिला हॉकी संघाचा आज अर्जेंटीनाशी मुकाबला
आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघ सेमीफायनल्सचा सामना अर्जेंटीनासोबत खेळणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनल्सच्या सामन्यात बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून सर्वांच्या नजरा महिला हॉकी संघाकडे लागून राहिल्या आहे. देशातील प्रत्येक जण आज यांच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचला आहे. दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अशातच भारतीय महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे.
ऑलिम्पिक सुवर्णपदकापासून संघ केवळ दोन पावलं दूर
भारतीय महिला हॉकी संघ ऑलिम्पिक सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर आहे. दरम्यान, यापूर्वी त्यांना फायनल्स गाठण्यासाठी सेमीफायनल्समध्ये अर्जेंटीनावर मात करावी लागेल. सध्या भारतीय महिला संघानं इथपर्यंत पोहोचण्यासाठी तीन वेळचा चॅम्पियन संघ ऑस्ट्रेलियाला 1-0 अशा फरकानं पराभूत करत माघारी धाडलं आहे.
भारताचं आजचं वेळापत्रक
बॉक्सिंग
सकाळी 11 वाजता, लवलीना बोरगोहेन विरुद्ध बुसेनाज सुरमेनेली (तुर्की) महिला 69 किलो बॉक्सिंग उपांत्य फेरी
गोल्फ
सकाळी 4 वाजता, अदिती अशोक आणि दीक्षा डागर, महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक प्ले, पहिली फेरी
हॉकी
दुपारी 3.30 वाजता, भारत विरुद्ध अर्जेंटिना, महिला संघ उपांत्य फेरी
कुस्ती
सकाळी 8 वाजता, रवि कुमार विरुद्ध ऑस्कर टिगरेरोस उरबानो (कोलंबिया), पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो
सकाळी 8 वाजता, अंशु मलिक विरुद्ध इरिना कुराचिकिना (बेलारूस), महिला फ्रीस्टाइल 57 किलो
सकाळी 8 वाजता, दीपक पुनिया विरुद्ध एकरेकेम एगियोमोर (नायजेरिया), पुरुष फ्रीस्टाइल 86 किलो