Tokyo Olympics 2020 : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं विजयी सुरुवात केली आहे तर तिरंदाजी प्रकारात भारताच्या दिपिकाकुमारी आणि प्रवीण जाधवची उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तर 10 मीटर एअर पिस्टल (पुरुष) स्पर्धेत सौरभ चौधरीनं जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. सौरभ चौधरीनं परफेक्ट 100 स्कोअर केला आहे. तर 10 मीटर एअर पिस्टलमध्ये लावेनिल वालारिवन, अपूर्वी चंडेलाचं आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात आलं आहे.
तीरंदाजी- क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली दीपिका-प्रवीणची जोडी
ऑलिम्पिकमध्ये तीरंदाजी स्पर्धेत दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव या जोडीनं क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव या जोडीनं चीनी ताइपे यांच्या जोडीला 5-3 अशी मात देत तीरंदाजी मिक्स्ड डबल्स के क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे.
सौरभ चौधरी 10 मीटर एअर पिस्टलच्या फायनलमध्ये
10 मीटर एअर पिस्टल (पुरुष) स्पर्धेत सौरभ चौधरीनं जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. सौरभ चौधरीनं 10 मीटर एअर पिस्टलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. सौरभ चौधरीने 586 स्कोअर केला आहे. भारताचा अभिषेक वर्मा मात्र फायनलमध्ये पोहोचू शकला नाही.
लावेनिल वालारिवन, अपूर्वी चंडेलाचं आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात
टोकियो ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर्स एअर रायफल नेमबाजीत भारताची इलावेनिल वालारिवन 16 व्या, तर अपूर्वी चंडेला 36व्या स्थानावर राहिली. दोघींचं आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात आलं आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी सुरुवात, न्यूझीलंडवर 3-2नं मात
भारतीय पुरुष हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केली आहे. न्यूझीलंडवर 3-2 अशी मात करत भारतानं विजयी आरंभ केला आहे. भारतीय संघानं शेवटच्या क्वार्टरमध्ये आपली आघाडी कायम ठेवत शानदार विजय मिळवला आहे. हरमनप्रीतनं भारताकडून दोन गोल केले तर एक गोल रुपेंद्रनं केला. आता रविवारी भारताची लढत ऑस्ट्रेलियासोबत असणार आहे.
टेबल टेनिस- मिक्स्ड डबल्समध्ये भारताचं आव्हान संपुष्टात
टेबल टेनिसच्या मिक्स्ड डबल्स स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताची मनिका बत्रा आणि शरत कमल ही या जोडीला चीनच्या ताइपे जोडीनं मात दिली.
पहिलं सुवर्णपदक चीनच्या नावे
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक चीनच्या खात्यात गेलं आहे. 10 मीटर एअर रायफलमध्ये चीननं सुवर्णपदक मिळवलं आहे. चीनची यांग कियान हिनं 251.8 स्कोअर करत गोल्ड मेडल प्राप्त केलं आहे. यांग कियाननं हा स्कोर करत ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड देखील केलं आहे.