Tokyo Olympics 15th Day Schedule : टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारताच्या खात्यात आणखी काही पदकं जमा होण्याची शक्यता आहे. भारतीय गोल्फर अदिती अशोक तिसऱ्या राउंडनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिचा सामना भारतीय वेळेनुसार, पहाटे तीन वाजता सुरु होईल. दरम्यान, शनिवारी टोकियोतील वातावरणंही खराब असेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. 


भालाफेकमध्ये पूल ए मध्ये नीरज अव्वल ठरला. नीरजच्या या कामगिरीने संपूर्ण देश खूप आनंदी आहे. संपूर्ण देशाला आशा आहे की नीरज टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर नक्कीच कब्जा करेल. त्याचबरोबर पूल बी सामन्यात भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा नदीम अर्शदनेही अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. नदीमने त्याच्या पूलमध्ये 85.16 मीटर भाला फेकून प्रथम स्थान मिळवले. अंतिम सामन्यात नीरज आणि नदीम आमने-सामने असतील. 


टोकियो ऑलिम्पिकमध्ये पंधराव्या दिवसासाठी भारताचं शेड्यूल :


अॅथलेटिक्स :


नीरज चोप्रा, पुरूष भालाफेक अंतिम सामना : भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साढेचार वाजता


गोल्फ :


अदिती अशोक आणि दीक्षा डागर, महिला एकेरी व्यक्तिगत स्ट्रोक प्ले चौथी फेरी : भारतीय वेळेनुसार सकाळी तीन वाजता 


कुस्ती :


बजरंग पुनिया, पुरूषांच्या 65 किग्रॅ वजनीगटाचा फ्रिस्टाइल कांस्य पदकासाठी सामना, भारतीय वेळेनुसार दुपारी सव्वा तीन वाजता सुरु झाल्यानंतर दुसरा किंवा तिसरा सामना 


चौदाव्या दिवशी भारताच्या पदरी निराशा 


टोकियो ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारचा दिवस भारतासाठी फारसा खास ठरला नाही. सर्वात आधी भारतीय महिला हॉकी संघाला कांस्य पदाकाच्या लढाईल ब्रिटनकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर बजरंग पुनियाचा रियो ऑलिम्पिकचा कांस्य पदक विजेता आणि तीन वेळचा जागतिक चॅम्पियन अजरबॅदान हाजी अलीकडून पुरुषांच्या फ्रिस्टाइल 65 किग्रॅ उपांत्यपूर्व फेरीत परभाव झाला. तसेच आपला पहिला ऑलिम्पिक खेळणारी भारताची पहिलवान सीमा बिस्लाचा 50 किग्रॅच्या पहिल्या फेरीत ट्युनिशियाच्या सारा हमदीकडून 1-3 अशा फरकानं पराभव झाला. याव्यतिरिक्त, गोल्फमध्येही भारतासाठी दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 23 वर्षांची गोल्फर अदिती अशोक दुसऱ्या फेरीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे अदितीकडून पदकाच्या आशा उंचावल्या आहेत.