Olympic Full Schedule 2 August: टोकियो ऑलिम्पिकचा 10 वा दिवस भारतासाठी खास होता. कारण पी व्ही सिंधून बॅडमिंटनमध्ये भारताला कांस्य पदक जिंकून दिलं आहे. तसेच पुरुष हॉकी संघानेही उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उद्या म्हणजेच सोमवारी भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकून पदक मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. हॉकी संघाव्यतिरिक्त कमलप्रीत कौर महिला थाळी फेकच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. ती देखील भारतासाठी पदक जिंकून देण्यासाठी मैदानात उतरेल. सोमवारी टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या संपूर्ण वेळापत्रकावर नजर टाकूया.


अॅथलेटिक्स


सकाळी 7:25 वाजता : दुती चंद, महिलांची 200 मीटर हीट फोर
 सायंकाळी 4:30 वाजता : कमलप्रीत कौर, महिलांची थाळी फेक फायनल


घोडेस्वारी


दुपारी 1:30 वाजता : फवाद मिर्झा, इव्हेंटिंग जंपिंग वैयक्तिक पात्रता
सायंकाळी 5:15 वाजता : वैयक्तिक जम्पिंग फायनल


हॉकी


सकाळी 8:30 वाजता : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, महिला हॉकी, उपांत्यपूर्व फेरी


नेमबाजी


सकाळी 8 वाजता : संजीव राजपूत आणि ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, पुरुषांची 50 मीटर रायफल थ्री पोझिशन क्वालिफिकेशन 
दुपारी 1:20 वाजत : पुरुषांची 50 मीटर रायफल थ्री पोझिशन फायनल 


भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये आजच दिवस कसा होता? 


बॅडमिंटन : पीव्ही सिंधूने रविवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. प्लेऑफ सामन्यात चीनच्या बिंग जियाओचा 21-13, 21-15 असा पराभव करून महिला एकेरीचे कांस्यपदक जिंकले आणि ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.


हॉकी : भारतीय पुरुष संघाने ग्रेट ब्रिटनचा 3-1 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.


बॉक्सिंग : सतीश कुमार (+91 किलो) विश्वविजेता बाखोदिर जलोलोव (उझबेकिस्तान) कडून 0-5 ने पराभूत झाल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडला.


गोल्फ : पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत अनिर्बन लाहिरीने संयुक्तपणे 42 वे आणि उदयन मानेने 56 वे स्थान मिळवले. 


संबंधित बातम्या