Tokyo 2020 Paralympic Games: भारतीची टेबल टेनिसपटू भाविनाबेनने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिक उपांत्यपूर्व फेरी गाठणारी भाविनाबेन पटेल ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. टोकियो गेम्समध्ये महिला एकेरीच्या वर्ग 4 मध्ये भाविनाबेनने ब्राझीलच्या जॉयस डी ऑलिव्हिराचा पराभव केला. भारतासाठी पदक जिंकण्यापासून भाविनाबेन फक्त दोन पावले दूर आहे.


भारताची 34 वर्षीय पटेल शेवटच्या 16 व्या सामन्या 12-10, 13-11, 11-6 ने जिंकली. आता तिचा सामना सर्बियाच्या बोरिस्लावा पेरिच रँकोवीशी होईल. आता जर भाविनाबेनने उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला तर ती उपांत्य फेरी गाठेल.


भाविनाबेनने कबूल केले आहे की, उपांत्य फेरीत जिंकण्यासाठी तिला आपली सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. ती म्हणाली, "माझ्या प्रशिक्षकांनी मला प्रतिस्पर्ध्याच्या शरीराजवळ खेळण्यास सांगितले आणि मी तेच केले. पुढच्या फेरीत जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूशी स्पर्धा आहे आणि मला माझा सर्वोत्तम द्यायचा आहे.


Tokyo Paralympics 2020 : भारताला धक्का; आजारी असल्याने सुयश जाधव आजच्या स्पर्धेला मुकणार


शॅकलटनवर मिळवला विजय 
तत्पूर्वी, भाविनाबेन पटेलने ग्रेट ब्रिटनच्या मेगन शॅकलटनवर 3-1 असा विजय नोंदवला होता. या विजयानंतर भाविनाबेन पटेलला उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले. 41 मिनिटे चाललेल्या सामन्यात भाविनाबेनने शॅकलटनचा 11-7, 9-11, 17-15, 13-11 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत भाविनाबेन 12 व्या क्रमांकावर होत्या, तर शॅकलटन 9 व्या क्रमांकावर होते.


मात्र, टेबल टेनिसमधील भारताचे दुसरे आव्हान संपले आहे. भारताची टेबल टेनिसपटू सोनलबेन मनुभाई पटेल गटातील दोन्ही सामने गमावल्यानंतर बाहेर पडली.


टोकियो पॅरॉलिम्पिक स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचं आजपासूनचे शेड्यूल :


 


27 ऑगस्ट 
धनुर्विद्या, पुरुष एकेरी रिकर्व इव्हेंट : हरविंदर सिंह, विवेक चिंकारा
धनुर्विद्या, पुरुष एकेरी कंपाउंड इव्हेंट : राकेश कुमार, श्याम सुंदर स्वामी
धनुर्विद्या, महिला एकेरी कंपाउंड इव्हेंट : ज्योती बालियान 
धनुर्विद्या, मिश्र संघ कंपाउंड इव्हेंट : ज्योती बालियान 
पॉवर लिफ्टिंग, पुरुष एकेरी 65 किलोग्राम इव्हेंट : जयदीप देशवाल 
पॉवर लिफ्टिंग, महिला एकेरी 50 किलोग्राम इव्हेंट : सकीना खातून 
स्विमिंग, 200 मीटर एकेरी पदक SM7 : सुयश जाधव 


 


28 ऑगस्ट 
अॅथलेटिक्स, पुरुष एकेरी जेवलीन थ्रो (भालाफएक) F57 इव्हेंट : रणजीत भाटी 


 


29 ऑगस्ट 
अॅथलेटिक्स, पुरुष डिस्कस थ्रो F52 : विनोद कुमार 
अॅथलेटिक्स, पुरुष हाय जंप T47 इव्हेंट : निषाद कुमार, राम पाल 


 


30 ऑगस्ट 
अॅथलेटिक्स, पुरुष एकेरी डिस्कस थ्रो F56 : योगेश कठूनिया 
अॅथलेटिक्स, पुरुष एकेरी जेवलीन थ्रो (भालाफेक) F46 : सुंदर सिंह गुर्जर, अजीत सिंह, देवेंद्र झाझरिया 
अॅथलेटिक्स, पुरुष जेवलीन थ्रो (भालाफेक) F64 : सुमित अंटिल, संदीप चौधरी 
नेमबाजी, 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1, पुरुषांचा राऊंड वन इव्हेंट : स्वरूप महावीर उन्हालकर, दीपक सैनी 
नेमबाजी, 10 मीटर एअर रायफल SH1, महिलांचा राऊंड 2 : अवनि लेखरा 


 


31 ऑगस्ट 
अॅथलेटिक्स, पुरुषांची हाय जंप T63 इव्हेंट : शरद कुमार, मरीयप्पन थंगावेलू, वरुण सिंह भाटी  
अॅथलेटिक्स, महिलांची 100 मीटर रेस : सिमरन 
अॅथलेटिक्स, महिलांचा शॉट पट F34 इव्हेंट : भाग्यश्री माधवराव जाधव 
नेमबाजी, 10 मीटर एअर पिस्तुल SH1, पुरुषांचा P1 इव्हेंट : मनीष नरवाल, दीपेंदर सिंह, सिंहराज 
नेमबाजी, 10 मीटर एअर पिस्तुल SH1, महिलांचा P2 इव्हेंट : रूबीना फ्रांसिस 


 


1 सप्टेंबर 
अॅथलेटिक्स, पुरुषांचा क्लब थ्रो F51 इव्हेंट : धरमबीर नॅन, अमित कुमार सरोहा
बॅडमिंटन, पुरुष एकेरी SL3 : प्रमोद भगत, मनोज सरकार 
बॅडमिंटन, महिला एकेरी SU5 : पलक कोहली
बॅडमिंटन, मिश्र दुहेरी SL3-SU5 : प्रमोद भगत आणि पलक कोहली


 


2 सप्टेंबर
अॅथलेटिक्स, पुरुषांचा शॉट पट F35 इव्हेंट : अरविंद मालिक 
बॅडमिंटन, पुरुष एकेरी SL4 : सुहास ललिनाकरे यथिराज, तरुण ढिल्लों 
बॅडमिंटन, पुरुष एकेरी SS6 : कृष्ण नगर 
बॅडमिंटन, महिला एकेरी SL4 : पारुल परमार 
बॅडमिंटन, महिला दुहेरी SL3-SU5: पारुल परमार आणि पलक कोहली 
पॅरा-कॅनोईंग, महिलांचा VL2 इव्हेंट : प्राची यादव 
ताइक्वांडो, महिलांचा K44-49 किलोग्राम इव्हेंट : अरुणा तंवर 
नेमबाजी, 25 मीटर पिस्तुल SH1, मिश्र P3 इव्हेंट : आकाश आणि राहुल जाखड


 


3 सप्टेंबर
अॅथलेटिक्स, पुरुषांची हाई जंप T64 इव्हेंट : प्रवीण कुमार 
अॅथलेटिक्स, पुरुषांचा जेवलीन थ्रो (भालाफेक) F54 : टेक चंद 
अॅथलेटिक्स, पुरुषांचा शॉट पट F57 : सोनम राणा 
अॅथलेटिक्स, महिलांचा क्लब थ्रो F51 इव्हेंट : एकता भयान, कशिश लाकरा 
स्विमिंग, 50 मीटर बटरफ्लाय S7 : सुयश जाधव, निरंजन मकुंदन 
नेमबाजी, 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1, पुरुष इव्हेंट : दीपक सैनी 
नेमबाजी, 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1, महिला इव्हेंट : अवनि लेखरा 


 


4 सप्टेंबर
अॅथलेटिक्स, पुरुषांचा जेवलीन थ्रो (भालाफेक) F41 इव्हेंट : नवदीप सिंह 
नेमबाजी, 10 मीटर एयर रायफल प्रोन, मिश्र R3 : दीपक सैनी, सिद्धार्थ बाबू, अवनी लेखरा 
नेमबाजी, 50 मीटर पिस्तुल SH1, मिक्स्ड P4 इव्हेंट : आकाश, मनीष नरवाल, सिंहराज 


 


5 सप्टेंबर
नेमबाजी, 50 मीटर रायफल प्रोन SH1, मिश्र R6 इव्हेंट : दीपक सैनी, अवनी लेखरा, सिद्धार्थ बाबू