Priyesha Deshmukh and Shrikant Dhanush Win Gold medal : ब्राझिलमध्ये सध्या मूकबधिर खेळाडूंची ऑलिम्पिक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेततून भारतासाठी आनंदाची बातमी आहे. भारताच्या प्रियेशा देशमुख आणि श्रीकांत धनुष या नेमबाज जोडीनं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 10 मीटर्स एअर रायफल प्रकाराच्या मिश्र दुहेरीत प्रियेशा आणि श्रीकांत ही जोडी सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. त्यांच्या या यशाने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशानंतर दोघांवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.


सध्या ब्राझीलमध्ये 24 वी मूकबधिर ऑलिम्पिक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारताला मोठे यश मिळाले आहे. प्रियेशा देशमुख आणि श्रीकांत धनुष या नेमबाज जोडीनं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. दरम्यान, श्रीकांत धनुषने 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले होते. यासोबतच शौर्य सैनीनेही या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे.


कर्णबधिर ऑलिम्पिकमध्ये एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत 8 खेळाडूंमध्ये अंतिम सामना झाला. यामध्ये धनुषने 247.5 च्या विक्रमी गुणांसह सुवर्णपदक जिंकले होते. दक्षिण कोरियाच्या किम वांगने 246.6 गुणांसह दुसरे, तर भारताच्या शौर्य सैनीने 224.3 गुणांसह तिसरे स्थान पटकावले होते. या ऐतिहासिक विजयासाठी माजी ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंगने धनुष आणि शौर्याला सलाम केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, जेव्हा व्यासपीठावर एकाच वेळी 2 भारतीय झेंडे फडकत असतात, तेव्हा यापेक्षा चांगली भावना काहीही असू शकत नाही. धनुष आणि शौर्याने संपूर्ण भारताला अभिमान वाटला. तुमच्या जिद्द, उत्साह, मेहनत आणि समर्पणाला मी सलाम करतो असे त्याने ट्वीटमध्ये म्हटले होते.


महत्त्वाच्या बातम्या: