पॅरिस: भारतीय खेळाडू दुसऱ्या दिवशी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) पदक मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहेत.भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू ग्रुप स्टेजमधील सामना खेळेल. तर, नेमबाज मनू भाकरकडून देशाला सुवर्णपदकाची आशा आहे. शुटिंग, रोईंग , टेबल टेनिस, जलतरण, नेमबाजी, टेनिस, बॉक्सिंग, आर्चरी या खेळांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत.
भारताच्या खेळाडूंचे सामने कधी?
वेळ आणि क्रीडा प्रकार
12.45 वाजता, नेमबाजी
नेमबाजी मध्ये महिला 10 मीटर एअर रायफल पात्रता स्पर्धेत इलावेनिल वलारिवान आणि रमिता जिंदाल सहभागी होतील.
12.50 वाजता, बॅडमिंटन
पी.व्ही. सिंधू महिला एकेरी ग्रुप स्टेजच्या लढतीत सहभागी होईल.
1.06 वाजता, रोईंग
बलराज पानवार पुरुष एकेरी रोईंगमध्ये सहभागी होईल.
2.12 वाजता, टेबल टेनिस
महिला एकेरी राऊंड ऑफ 64 मध्ये श्रीजा अकुला भारताचं प्रतिनिधीत्व करेल.
2.30 वाजता, जलतरण
श्रीहरी नटराज हा पुरुष 100 मीटर जलतरण बॅक स्ट्रोकमध्ये सहभागी होईल. जलतरण महिला 200 मीटर फ्री स्टाईलमध्ये धीनीधी देसिंघू ही भारताचं प्रतिनिधीत्व करेल.
2.45 वाजता,नेमबाजी
संदीप सिंग आणि अर्जुन बबुता हे 10 मीटर एअर रायफल पात्रता फेरीत सहभागी होतील.
3.00 वाजता टेबल टेनिस
पुरुष एकेरी टेबल टेनिसमध्ये राऊंड ऑफ 64 मध्ये शरथ कमल भारताचं प्रतिनिधीत्व करेल.
3.30 वाजता नेमबाजी
भारताला मनू भाकरकडून पदकाची आशा आहे. 10 मीटर एअर रायफल नेमबाजीच्या अंतिम फेरीत मनू भाकर खेळेल. सुवर्णपदक मिळवण्यात ती यशस्वी होते का ते पाहावं लागेल.
3.30 वाजता टेनिस
पुरुष एकेरी पहिल्या फेरीत भारताचा सुमित नागल सहभागी होईल.
3.50 वाजता, बॉक्सिंग
महिला 50 किलो वजनी गटात राऊंड ऑफ 32 मध्ये निखत झरीन भारतातर्फे सहभागी होईल.
4.30 वाजता, टेबल टेनिस
राऊंड ऑफ 64 टेबल टेनिसमध्ये मानिका बात्रा ही भारतातर्फे खेळेल.
5.45 , तिरंदाजी
भारताला महिला तिरंदाजांकडून देखील पदकाची आशा आहे. उपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी, भजन कौर आणि अंकिता भकत खेळतील.
7.45 वाजता, तिरंदाजी
दीपिका कुमारी, भजन कौर आणि अंकिता भकत यांना उपांत्यपूर्वी फेरीत यश मिळाल्यास उपांत्य फेरीचा सामना सायंकाळी 7.45 वाजता होईल.
8.00 वाजता बॅडमिंटन
भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता पुरुष एकेरी ग्रुप स्टेजमध्ये एचएस प्रणॉयचा सामना असेल.
8.18 वाजता, तिरंदाजी
दीपिका कुमारी, भजन कौर आणि अंकिता भकत यांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तिरंदाजीत उपांत्य फेरीनंतर कांस्य पदकाची लढत रात्री 8.18 वाजता होईल. 8.41 वाजता तिरंदाजीची अंतिम फेरी होईल.
संबंधित बातम्या :