Paris Olympics 2024 India’s Schedule Dates and Event Times पॅरिस: जगभरातील क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं लक्ष ज्या स्पर्धेकडे लागलेलं असती ती ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिसमध्ये (Paris Olympics 2024) सुरु होत आहे. उद्घाटन सोहळा 26 जुलै रोजी पार पडणार आहे. भारताचं अभियान उद्यापासून सुरु होणार आहे. भारताचे 117 खेळाडू 16 खेळांमध्ये पदक जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील.
भारतानं आतापर्यंतची सर्वात मोठी टीम ऑलिम्पिकला पाठवली आहे. यामध्ये एथलेटिक्स टीमध्ये 29 खेळाडू आहेत. यामध्ये टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचा देखील समावेश आहे. नेमबाजीत भारताचे 21 खेळाडू मैदानात उतरणार आहेत. टोक्यो ऑलिम्पिकच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चांगल्या कामगिरीची आशा
तिरंदाजीत दीपिका कुमार आणि तरुणदीप रॉय रँकिंग राऊंडमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देऊ शकतात, त्यांच्या लढती 25 जुलै रोजी होतील. 27 जुलै रोजी संदीप सिंग / एलावेनिल वालारिवन आणि अर्जुन बबुता, रमित जिंदल मिश्र 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत मैदानात उतरतील. पिस्टल स्पर्धेत मनू भाकर देखील पदकाची दावेदार आहे. नीरज चोप्राच्या भालाफेक स्पर्धेची क्वालिफायर लढत 6 ऑगस्टला होईल.तर, 8 ऑगस्टला फायनल असेल.
मीराबाई चानू 7 ऑगस्टला 49 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग स्पर्धेत सहभागी होईल. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये लवलीना गोरगाहेन 27 जुलपासून सुरु होणाऱ्या बॉक्सिंग स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करेल. निखत झरीनकडून देखील पदकाची खूप अपेक्षा आहे.
ऑलिम्पिकचं लाईव्ह प्रक्षेपण कुठं होणार?
पॅरिस ऑलिम्पिकचं थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18, डीडी स्पोर्ट्स 1.0 वरुन केलं जाईल. 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान जिओ सिनेमावर देखील प्रक्षेपण केलं जाणार आहे.
16 खेळांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी घेणार आहेत. यामध्ये तिरंदाजी, एथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, घोडेस्वारी, गोल्फ, हॉकी, जूडो, रोइंग, नौकायन, नेमबाजी, तैराकी, टेबल टेनिस आणि टेनिस या खेळांचा समावेश असेल.
टोक्यो ऑलिम्पिकचं रेकॉर्ड
भारतानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 2020 मध्ये एका सुवर्णपदकासह सात पदकं जिंकली होती. यावेळी त्या पेक्षा अधिक पदकं जिंकण्याच्या इराद्यानं भारतीय खेळाडू मैदानात उतरतील.
भारताच्या खेळाडूंचं ऑलिम्पिकचं वेळापत्रक
क्रीडा प्रकार | स्पर्धा सुरु होण्याची तारीख | संपण्याची तारीख | किती भारतीय खेळाडू लढणार |
भारताच्या खेळाडूंची संख्या
|
तिरंदाजी | 25 जुलै | 4 ऑगस्ट | 5 | 6 |
एथलेटिक्स | 1 ऑगस्ट | 10 ऑगस्ट | 16 | 29 |
बॅडमिंटन | 27 जुलै | 5 ऑगस्ट | 4 | 7 |
बॉक्सिंग | 27 जुलै | 10 ऑगस्ट | 6 | 6 |
घोडेस्वारी | 30 जुलै | 4 ऑगस्ट | 1 | 1 |
गोल्फ | 1 ऑगस्ट | 10 ऑगस्ट | 2 | 4 |
हॉकी | 27 जुलै | 8 ऑगस्ट | 1 | 16 |
जूडो | 2 ऑगस्ट | 2 ऑगस्ट | 1 | 1 |
रोइंग | 27 जुलै | 3 ऑगस्ट | 1 | 1 |
सेलिंग | 1 ऑगस्ट | 6 ऑगस्ट | 2 | 2 |
शूटिंग | 27 जुलै | 5 ऑगस्ट | 15 | 21 |
तैराकी | 28 जुलै | 29 जुलै | 2 | 2 |
टेबल टेनिस | 27 जुलै | 10 ऑगस्ट | 4 | 6 |
टेनिस | 27 जुलै | 4 ऑगस्ट | 2 | 3 |
कुस्ती | 5 ऑगस्ट | 11 ऑगस्ट | 6 | 6 |
वेटलिफ्टिंग | 7 ऑगस्ट | 7 ऑगस्ट | 1 | 1 |
संबंधित बातम्या :
Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदकं कुणाच्या नावावर, टॉप 5 मध्ये 'या' देशांचा समावेश