Neeraj Chopra Wins Gold: भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. देशासाठी वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा तो दुसरा खेळाडू आणि पहिला अॅथलीट बनला आहे. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर अंतरासह पहिले स्थान मिळवले. झेक प्रजासत्ताकचा याकूब वाल्देझ दुसऱ्या स्थानावर तर त्याच्याच देशाच्या विट्स्लाव व्हेसेलीने 85.44 मीटरसह कांस्यपदक मिळवले.


सुवर्ण जिंकल्यानंतर नीरजची प्रतिक्रिया
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर भालाफेकपटू नीरज चोप्रा म्हणाला, "हे अविश्वसनीय आहे, माझ्यासाठी आणि देशासाठी अभिमानाचा क्षण आहे." येथे टोकियोमध्ये नीरजने इतिहास रचला आहे .कारण भारताने यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. नीरजच्या आधी अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते, पण नेमबाजीत त्याने सुवर्ण जिंकले.


नीरज चोप्रा कोण आहे?
नीरज चोप्रा हा भालाफेक स्पर्धेत भाग घेणारा भारतीय ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट आहे. तो मूळचा पानिपत, हरियाणाचा आहे. अंजू बॉबी जॉर्ज नंतर जागतिक चॅम्पियनशिप स्तरावर अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय आहे. नीरजने 2017 च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 85.23 मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले होते.


2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने 82.23 मीटर भालाफेक करुन सुवर्णपदक जिंकले आणि भारतीय राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली. तर नीरजने 2017 च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 85.23 मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने 86.47 मीटर भाला फेकून स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते.