नीरज चोप्रा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. टोकियोमध्ये इतिहास रचल्यानंतर नीरज चोप्रा ऑलिम्पिकचा विक्रम मोडण्याच्या विचारात आहे. नीरज चोप्राला 2024 पॅरिस ऑलिम्पिक गेम्समध्ये अँड्रियास थोर्किल्डसनच्या नावावर असलेला भालाफेकचा विक्रम मोडायचा आहे. यासाठी नीरज चोप्रा लवकरच तयारी सुरू करणार आहे.


नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर गुणांसह सुवर्णपदक जिंकले. नीरज चोप्राची सर्वोत्तम स्कोर 88.07 मीटर आहे. नीरज चोप्राने आता 90 मीटरपेक्षा जास्त स्कोर मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील 90.57 मीटरचा विक्रम मोडण्यासाठी नीरज चोप्रा डोळे लावून बसला आहे.


अँड्रियास थोर्किल्डसनने 2008 मध्ये बीजिंगमध्ये 90.57 मीटरच्या प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले, जो ऑलिम्पिक विक्रम आहे. ही कामगिरी करणे हा एक अद्भुत अनुभव असेल असे नीरज म्हणाला. नीरज चोप्रा म्हणाला, "ऑलिम्पिक सुवर्णपदक अव्वल आहे. पण अॅथलेटिक्समध्ये तुम्ही तुमच्या सुवर्णपदकामध्ये आणखी एक गोष्ट जोडू शकता आणि ती म्हणजे ऑलिम्पिक विक्रम.


लवकरच पुन्हा प्रशिक्षण सुरू होईल
नीरज चोप्राला आता एक पाऊल पुढे जायचे आहे. स्टार खेळाडू म्हणाला, "राष्ट्रीय विक्रम माझ्या नावावर 88.07 मीटर आहे तर ऑलिम्पिक रेकॉर्ड 90.57 मीटर आहे. जर मी एक पाऊल पुढे जाऊ शकलो असतो, तर ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आणि ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक ठरले असते.


व्यस्त वेळापत्रकामुळे नीरज चोप्राने नुकताच आपला 2021 चा हंगाम संपवण्याची घोषणा केली. नीरज चोप्राला आता शक्य तितक्या लवकर त्याचे प्रशिक्षण पुन्हा सुरू करायचे आहे.


'सुवर्णफेक' करणाऱ्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव


टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णफेक करत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. नीरजनं इतिहास रचत चमकदार कामगिरी नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तब्बल 13 वर्षानंतर  म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे.