नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मनू भाकरनं (Manu Bhaker) मिळवून दिलं. मनू भाकरनं नेमबाजीत दोन कांस्य पदकं मिळवली. यामुळं तिची देशभर चर्चा झाली. दुसरीकडे भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) यावेळी रौप्यपदक मिळवलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राचे मनू भाकर आणि तिच्या आईसोबत चर्चा करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले अन् दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या. मनू भाकरच्या वडिलांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मनू भाकरनं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नीरज चोप्राबरोबरच्या लग्नाच्या चर्चांवर उत्तर दिलं आहे.
मनू भाकरनं न्यूज-18 ला मुलाखत दिली. या मुलाखतीत मनू भाकरला नीरज चोप्रासोबतच्या लग्नाबाबतच्या चर्चांवर प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत बोलताना मनू भाकरची प्रतिक्रिया चर्चेत आहे. नीरज शर्माबाबतच्या प्रश्नावर मनू भाकर पहिल्यांदा लाजली, यानंतर हसली आणि उत्तर दिलं. नीरज चोप्रा आणि माझी जादा बातचीत होत नाही.आम्ही एखाद्या स्पर्धेत अन् इव्हेंटमध्ये भेटतो. ज्या चर्चा आहेत तसं काही नाही, असं मनू भाकर म्हणाली होती. मनू भाकरनं नीरज चोप्रासोबतच्या लग्नाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. मात्र, मनू भाकर नीरज चोप्राबाबतच्या प्रश्नावर ज्या प्रकारे हसली त्यामुळं याच्या क्लीप अनेकांकडून शेअर केल्या जात आहेत.
काही दिवसांपूर्वी नीरज चोप्रा आणि मनू भाकर चर्चा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मनू भाकर आणि नीरज चोप्रा त्यावेळी एकमेकांच्या नजरेला नजर देत नव्हते.त्यामुळं दोघांच्या बाबतीत चर्चा सुरु झाल्या.यानंतर पुढचा टप्पा म्हणजे नीरज चोप्रा आणि मनू भाकरची आई यांच्यातील चर्चेचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओत मनू भाकरची आई सुमेधा भाकर नीरज चोप्रासोबत बोलताना डोक्यावर हाथ मारताना पाहयाल मिळाल्या. त्यामुळं मनू भाकर आणि नीरज चोप्राच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या. सोशल मीडियावर या चर्चांना बळ मिळालं, काही लोकांनी मनू भाकरची आई नीरज चोप्रासोबत लेकीच्या लग्नाची चर्चा करत असल्याचे दावे केले. मात्र, मनू भाकरच्या वडिलांनी समोर येत नीरज चोप्रा आणि मनू भाकर बाबतच्या सर्व चर्चा फेटाळल्या आणि चर्चा रोखण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोपाच्या कार्यक्रमात भारताची ध्वजवाहक म्हणून मनू भाकरची निवड करण्यात आली होती. मनू भाकर आणि भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश या दोघांनी भारताचे ध्वजवाहक म्हणून जबाबदारी पार पाडली.
संबंधित बातम्या :