Hima Das Corona Positive: भारतीय धावपटू हिमा दास हिला कोरोना (Covid-19) विषाणूचा संसर्ग झाला आहे. सध्या ती आयसोलेशनमध्ये आहे. तिने स्वतः ट्विट करून कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. ती म्हणाले की मी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. मी ठीक आहे आणि सध्या आयसोलेशनमध्ये आहे.
21 वर्षीय हिमा दासने अलीकडेच पटियाला येथील राष्ट्रीय खेळ संस्थेत (एनआयएस) राष्ट्रीय शिबिरासाठी रिपोर्ट केला होता आणि तिचे प्रशिक्षण सुरू होणार होते. मात्र, पटियालाला पोहोचल्यावर तिला सौम्य लक्षणे दिसत होती.
हिमाने ट्वीट केले आणि म्हणाली, "मला सर्वांना सांगायचे आहे की मी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. मी ठीक आहे आणि सध्या आयसोलेशनमध्ये आहे. मी या वेळेचा उपयोग बरी होण्यासाठी आणि पूर्वीपेक्षा मजबूतीनं परत येण्यासाठी करेन, प्रत्येकजण सुरक्षित राहा आणि मास्क घाला."
हिमा अखेरीस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सहभागी झाली होती, इंटर स्टेट मीटमध्ये तिने भाग घेतला होता. जिथे तिला 100 मीटर हीटमध्ये हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. यानंतर तिने 100 मीटर फायनल आणि 4x100 मीटर महिला रिलेमधून माघार घेतली. परंतु, 200 मीटर फायनलमध्ये भाग घेतला. क्वालिफिकेशन मार्क मिस झाल्यामुळे हिमा 2020 टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र होऊ शकली नाही.
हिमा दासनेही आपल्या चाहत्यांना वचन दिलंय की ती जोरदार पुनरागमन करेल आणि आता तिचे राष्ट्रकुल खेळ, आशियाई गेम्स आणि 2022 मध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेकडे लक्ष लागले आहे.