हॅमिल्टन : स्मृती मानधनाची झुंजार फलंदाजी लागोपाठ तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात अपयशी ठरली. न्यूझीलंडनं हॅमिल्टनच्या तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारतीय महिलांचा अवघ्या दोन धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह न्यूझीलंडनं तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत 3-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं.

न्यूझीलंडनं या सामन्यात भारतीय महिलांना विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर स्मृती मानधनानं 62 चेंडूत 86 धावांची खेळी उभारुन भारताला लक्ष्याच्या समीप नेलं होतं. स्मृतीचा अपवाद वगळता इतर भारतीय फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळं भारतीय महिलांना विजयानं दोन धावांनी हुलकावणी दिली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडच्या महिला संघाकडून डिव्हाईन आणि बेट्स या जोडीने पहिल्या विकेटसाठी आपल्या संघाला 46 धावांची भागीदारी करुन दिली.  डिव्हाईनने 52 चेंडूत 72 धावांची खेळी करताना डिव्हाईनने आपल्या संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन देण्यास मदत केली.  भारताकडून दिप्ती शर्माने 2 फलंदाजांना माघारी धाडलं.

न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 162 धावांचं आव्हान भारतीय महिला पूर्ण करु शकल्या नाहीत. 20 षटकांमध्ये भारतीय संघ 4 विकेटच्या मोबदल्यात 159 धावांपर्यंतच मजल मारु शकला. अवघ्या दोन धावांनी सामन्यात बाजी मारत न्यूझीलंडच्या महिलांनी मालिकाही खिशात घातली आहे. स्मृती मानधनानं भारताकडून धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं होतं. अखेरच्या सामन्यात संधी मिळालेल्या मिताली राजला एका चेंडूत 4 धावा काढून संघाला विजय मिळवून देण्याचं आव्हान होतं, मात्र ती  अयशस्वी ठरली.