मुंबई : तेवीस वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन प्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) ने तब्बल दोन वर्षांनंतर अमेरिकेत पहिला एकेरी सामना जिंकला आहे. यासोबतच सिनसिनाटी ओपन (Cincinnati Open) स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत दाखल झाला आहे. एटीपी मास्टर्स स्पर्धेमध्ये जोकोविचने प्रतिस्पर्धीकडून वॉकओव्हर मिळाला. दुखापतीमुळे स्पेनच्या अलेजांद्रो फोकिनाने सामन्यातून माघार घेतली. यावेळी जोकोविचने पहिला सेट 6-4 असा जिंकला होता. 


दोन वर्षानंतर अमेरिकेत पहिला सामना जिंकला


सर्बेरियाचा टेनिसपटू (Serbian Tennis Player) नोव्हाक जोकोविचने 2021 नंतर अमेरिकेमध्ये पहिला एकेरी सामना जिंकला. स्पॅनियार्डला दुसऱ्या सेटमध्ये मांडीच्या दुखापतीमुळे कोर्ट सोडावे लागले तेव्हा त्याने वेस्टर्न आणि सदर्न ओपनमध्ये अलेजांद्रो डेव्हिडोविच फोकिनाचा पराभव केला. जोकोविचने पहिला सेट 6- 4 ने जिंकला. यानंतर डेव्हिडोविचला दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली. यामुळे सामना 46 मिनिटांत संपला.


प्रतिस्पर्धीची माघार


नोव्हाक जोकोविचने सिनसिनाटी ओपनची तिसरी फेरी गाठली आहे. या एटीपी मास्टर्स स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत नोव्हाक जोकोविचचा प्रतिस्पर्धी डेव्हिडोविच फोकिना (Davidovich Fokina) याने माघार घेतली. दुखापतीमुळे डेव्हिडोविचला सामना खेळणे कठीण झालं. यावेळी जोकोविचने पहिला सेट 6-4 असा जिंकला होता. डेव्हिडोविच फोकिनाने सामन्यातून माघार घेतली. यामुळे जोकोविचने सामना जिंकला. 






'या' कारणामुळे दोन वर्ष अमेरिकत खेळता आलं नाही


नोव्हाक जोकोविच 2021 मध्ये यूएस ओपनचा उपविजेता होता. यानंतर, अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड-19 लसीकरण अनिवार्य केले आणि जोकोविच 2022 मध्ये अमेरिकेत होणाऱ्या कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकला नाही.


तब्बल दोन वर्षानंतर जोकोविच अमेरिकेत


कोरोनाची लस न घेतल्याने जोकोविच गेल्या दोन वर्षांत अमेरिकेत खेळू शकला नाही. त्यामुळे आता तब्बल दोन वर्षानंतर जोकोविच अमेरिकेत खेळत आहे. 2019 नंतर जोकोविच पहिल्यांदा यूएसमध्ये सामने खेळताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 


आता जोकोविचचा सामना फ्रान्सच्या गेल मॉनफिल्सशी


या वर्षी मे महिन्यामध्ये, यूएस सरकारने प्रवाशांसाठी कोविड -19 शी संबंधित नियम शिथिल केले, त्यामुळे नोव्हाक जोकोविच आता अमेरिकेत स्पर्धा खेळत आहे. 2018 आणि 2020 मध्ये जोकोविच येथे विजेता ठरला आहे. तिसऱ्या फेरीत जोकोविचचा सामना फ्रान्सच्या गेल मॉनफिल्सशी होणार आहे. मॉनफिल्सने दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मायनरचा पराभव केला.