मँचेस्टरः इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अँडरसनने पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत चौथ्या दिवशी गोलंदाजी करताना विश्व विक्रम आपल्या नावावर केला आहे. अँडरसनने मायदेशात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम नावावर केला आहे.
अँडरसनने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राचा 289 बळी घेण्याचा विक्रम मोडीत काढत या विश्व विक्रमाला गवसणी घातली. अँडरसनने पाकिस्तानविरुद्ध मायदेशात 67 वा कसोटी सामना खेळला. लंचपर्यंत अँडरसनला दोन बळी घेण्यात यश मिळालं.
मायदेशात कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
मायदेशात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकाचा माजी फीरकीपटू मुथैय्या मुरलीधरणच्या नावावर आहे. मुथैय्या मुरलीधरणने 73 सामन्यांच्या 134 इनिंगनध्ये बळी घेतले आहेत. दुसऱ्या स्थानावर भारताचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी फिरकीपटू अनिल कुंबळेचा क्रमांक लागतो. कुंबळेने घरच्या मैदानावर 63 कसोटी सामन्यात सामन्यात 350 बळी घेतले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्नचा तिसरा क्रमांक लागतो. वॉर्नने मायदेशात 69 सामन्यांतील 129 इनिंगमध्ये 329 बळी घेतले आहेत. अँडरसन 67 सामन्यात 290 विकेट झटकावून चौथ्या स्थानावर आला आहे. अँडरसनने आतापर्यंत 117 कसोटी सामन्यांतील 220 इनिंगमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक 457 विकेट घेतल्या आहेत.