दुबई: आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपची गदा ऑस्ट्रेलियाने पटकावली आहे. पण तरीही सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने यजमान संघाला व्हाईट वॉश दिल्यास, आणि उर्वरित दोन सिरीजमध्येही टीम इंडियाने उत्तम कामगिरी केली. तर भारतीय संघ कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावू शकते.

 

सध्याच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 4-0ने विजय संपादन केल्यास, आणि आगामी इंग्लंड आणि पाकिस्तान दौऱ्यातही भारतीय संघाने चांगली कामगिरी केली तर भारतीय संघाला हे शक्य होणार आहे. शिवाय ऑस्ट्रेलियानेही श्रीलंकेला 1-0 ने पराभूत केल्यास भारतीय संघाला आयसीसीच्या क्रमवारीत पहिले स्थान मिळवता येऊ शकते.

 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव स्मिथ याने 1 एप्रिलच्या वार्षिक कट ऑफ तारिखपर्यंत एमआरएफ टायर्स आयसीसी टेस्ट टीम रॅकिंगमधील अव्वल स्थान कायम राखल्याबद्दल आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपची गदा आणि 10 लाख डॉलर देऊन ऑस्ट्रेलियन संघाचा गौरव करण्यात आला.



 

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी पाल्लेकलमध्ये एका कार्यक्रमादरम्यान ही गदा स्मिथला सुपुर्द केली.

 

स्मिथने यावेळी आपल्या टीमचे कौतुक करून, जगातील नंबर एकचा संघ स्थान पटकावणे हे गौरवाची बाब असल्याचे सांगितले. तसेच याचे सर्व श्रेय गेल्या 12 महिन्यातील सर्व सहकार्यांचे असल्याचे त्याने सांगितले.