- कोहली आणि जयंतने 8 व्या विकेटसाठी भारतासाठी 241 धावांची भागिदारी केली. भारताकडून 8 व्या विकेटसाठी 200 पेक्षा जास्त धावांची भागीदारी करण्याची ही आठवी वेळ आहे.
- कोहली आणि जयंतने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि अनिल कंबळे यांचा 20 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. दोघांनी 1996 साली कोलकात्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना आठव्या विकेटसाठी 161 धावांची भागीदारी केली होती.
- कोहली आणि जयंतने इंग्लंड आणि भारत यांच्यातील 8 व्या विकेटसाठीच्या सर्वोच्च भागीदारीचा विक्रम मोडीत काढला. यापूर्वी इंग्लंडच्या रे इलिंगवर्थ आणि पीटर टेलर यांनी 1971 मध्ये आठव्या विकेटसाठी 161 धावांची भागीदारी रचली होती.
- इंग्लंडविरुद्ध एखाद्या देशाने 8 व्या विकेटसाठी एवढी भागीदारी करण्याची ही दुसरीच वेळ आहे. भारताची हा विक्रम तोडण्याची संधी केवळ 2 धावांनी हुकली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या एमजे हार्टिगन आणि क्लेम हिल यांनी 1908 मध्ये 243 धावांची भागीदारी केली होती.
- भारताकडून इंग्लडविरुद्ध 8 व्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी करण्याचा विक्रम यापूर्वी सय्यद किरमानी आणि रवी शास्त्री यांच्या नावावर होता. दोघांनी 1981 साली दिल्लीत खेळताना 128 धावा ठोकल्या होत्या.
- कोहलीने सलग तिसऱ्या कसोटी मालिकेत द्विशतक लगावलं. ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन आणि भारताचे माजी क्रिकेटर राहुल द्रविड यांच्यानतंर हा विक्रम नोंदवणारा विराट तिसरा खेळाडू ठरला. यापूर्वी विराटने वेस्ट इंडिजविरुद्ध 200 आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 211 धावा केल्या होत्या.
- एकाच वर्षात सगल तीन कसोटी मालिकांमध्ये द्विशतक ठोकणारा विराट पहिलाच फलंदाज आहे. सर डॉन ब्रॅडमन यांनी 1930 ते 1932 या काळात तीन कसोटी मालिकांमध्ये सहा द्विशतक ठोकले होते. तर द्रविडने 2003 ते 2004 या काळात सलग तीन कसोटी मालिकांमध्ये द्विशतक ठोकले होते.
- विराटने कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही रचला. विनोद कांबळी यांच्या मंबईतील सामन्यात 1993 साली 224 धावा आणि कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2013 साली चेन्नईत केलेल्या 224 धावांचा विक्रमही मोडीत काढला.
- विराटने यासोबतच या कसोटी मालिकेत 600 धावाही पूर्ण केल्या. एकाच कसोटी मालिकेत 600 पेक्षा अधिक धावा करण्याची विराटची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना 2014-15 साली 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 692 धावा केल्या होत्या.
- इंग्लंडविरुद्ध एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर झाला आहे. यापूर्वी राहुल द्रविडने 2002 साली इंग्लंड दौऱ्यावर चार सामन्यात 602 धावा केल्या होत्या.
- दुसरीकडे जयंत यादवनेही नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला. जयंतने फारुख इंजिनियर यांचा 50 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढत शतक ठोकलं. फारुख इंजिनियर यांनी 1965 साली न्यूझीलंडविरुद्ध चेन्नईच्या मैदानावर 90 धावा ठोकल्या होत्या.
संबंधित बातम्या :