मुंबई: क्रिकेटच्या इतिहासात आज पहिल्यांदाच वेगळे चित्र पाहायला मिळाले. कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये गुयाना अमेजन वॉरिअरस विरूद्ध सेंट किटस अॅन्ड वेविस पॅट्रीओटस सामन्यात सलामीचा फलंदाज लँडी सिमंसने फक्त एकच पॅड पायाला बांधून फलंदाजी केली.


 

सामन्याच्या सुरुवातीला सिमंस पहिल्या १२ ओव्हरपर्यंत दोन्ही पॅडने फलंदाजी करत होता. पण १२ व्या ओव्हरनंतर त्याने एका पायाचे पॅड काढून ८ व्या ओव्हरपर्यंत फलंदाजी करण्यास सुरुवात केली. लँडी सिमंसने आपल्या संघासाठी ५० धावा केल्या. तो शेवटच्या ओव्हरमध्ये रनाआउट झाला.

 

विशेष म्हणजे, त्याने यावेळी टी२०मधील सर्वात संथ गतीने अर्धशतक बनवण्याचा विक्रम केला. त्याने ६० बॉलमध्ये ५० धावा केल्या. सिमंसच्या संघाने १०९ धावांचे लक्ष प्रतिस्पर्ध्या संघाला दिले. प्रतिस्पर्ध्या संघाने हे लक्ष सहज पार केले.