रिओ दी जनैरोः उत्तेजक सेवन प्रकरणात क्रीडा लवादाच्या पॅनेलनं चार वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली, त्याक्षणी भारताचा पैलवान नरसिंग यादव बसल्या जागी बेशुद्ध झाला होता, अशी खळबळजनक बातमी पीटीआयनं दिली आहे.


 

क्रीडा लवादाच्या पॅनेलनं शिक्षा सुनावतानाच ऑलिम्पिक क्रीडाग्रामही सोडून मायदेशी परतण्याचा दिलेला आदेश, नरसिंगला सहन झाला नाही. तो बसल्या जागीच बेशुद्ध झाला, अशी माहिती भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी दिली. भारतीय कुस्ती महासंघ अजूनही नरसिंग यादवच्या पाठीशी असल्याचंही ब्रिजभूषण यांनी स्पष्ट केलं.

 

या प्रकरणात आपला कुणावरही आरोप नाही, पण सीबीआय चौकशीच्या मागणीवर आपण ठाम असल्याचंही ब्रिजभूषण यांनी स्पष्ट केलं आहे.