रिओ द जनैरोः भारताचा पैलवान नरसिंग यादववर चार वर्षांची बंदी घातल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दाद मागणार असल्याचं नरसिंगने सांगितलं आहे. क्रीडा लवादाने उत्तेजक सेवनप्रकरणी चार वर्षांची बंदी घातल्यामुळे त्याचं ऑलिम्पिक खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे.


 

उत्तेजक सेवन प्रकरणामुळे माझ्यासोबतच परदेशात भारताचंही नाव बदनाम झालं आहे. त्यामुळे न्याय मिळण्यासाठी पीएमओकडे अपील करणाचा नरसिंगने निर्धार केला आहे.  डोपिंगचा दाग लागल्यामुळे ऑलिम्पिक गावातून नरसिंगचं मान्यता कार्ड रद्द करण्यात आलं असून त्याला बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे त्याला सध्या एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.

 

उत्तेजक सेवनप्रकरणी नरसिंगला नॅशलन अँटी डोपिंग एजन्सी अर्थात नाडानं क्लीनचिट दिली होती. पण नाडाच्या या निर्णयाचा वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच वाडानं विरोध केला. वाडानं नाडाच्या त्या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे अपील केलं होतं. अखेर चार तासांच्या चर्चेनंतर क्रीडा लवादानं नरसिंगला चार वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली.

 

संबंधित बातम्याः

पैलवान नरसिंह यादववर चार वर्षाची बंदी, ऑलिम्पिकचं स्वप्नं भंगलं


 

माझं स्वप्न क्रूरपणे मोडलं: नरसिंग यादव