मुंबई: भारताचा पैलवान नरसिंग यादवला रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. ऑलिम्पिकच्या अधिकृत वेबसाईटवर भारतीय पथकात नरसिंगच्या नावाचा समावेश झाला आहे.

 

डोपिंगप्रकरणी नाडानं नरसिंगला क्लीनचिट दिल्यावर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या कुस्तीच्या जागतिक संघटनेनंही नरसिंगच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागाला हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीनं नरसिंगविषयी आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही.

 

सोमवारीच नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी अर्थात नाडानं नरसिंगला डोपिंगप्रकरणी क्लीन चिट दिली होती. त्या निर्णयाची माहिती भारतीय कुस्ती महासंघानं लगेचच युनायटेड वर्ल्ड रेसलिंगला पत्राद्वारे कळवली होती आणि नरसिंगच्या सहभागाविषयी पुनर्विचार करण्याची विनंती केली होती.

 

नाडाच्या निकालानंतर जागतिक कुस्ती संघटनेनं नरसिंगला ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे.