Push Ups World Record : नागपुरातील कार्तिक जयस्वाल (kartik jaiswal) या 21 वर्षीय तरुणाने एका तासात सर्वाधिक पुश अप्स (Push Ups World Record) मारण्याचा नवा विश्व विक्रम (New World Record) करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने एका तासांत तब्बल 3 हजार 331 पुश अप्स मारल्या आहेत. आता पर्यंत ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल स्कालीने मारलेल्या 3 हजार 218 पुश-अप्स हा विक्रम असून आता हा रेकॉर्ड कार्तिकच्या नावावर होण्याची शक्यता आहे.
व्यायाम सुरु केल्यानंतर सर्वात बेसिक व्यायाम हा पुश-अप्स हाच असतो. पण बेसिक असूनही करण्यासाठी अत्यंत अवघड असणारे पुश-अप्स सलग एक तास तेही 3 हजार 331 मारणं म्हणजे खरचं जिकरीचं काम आहे. ही कामगिरी नागपुरातील कार्तिक जयस्वाल या 21 वर्षीय तरुणाने केली आहे .त्यामुळे आता कार्तिक नवा विश्व विक्रम रचू शकतो. आता पर्यंत हा विक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल स्कालीच्या नावावर होता. त्याने 3 हजार 218 पुश-अप्स मारल्या होत्या. पण आता कार्तिकने त्याच्याहून अधिक पुश-अप्स मारल्याने एक नवा रेकॉर्ड होऊ शकतो. कार्तिकने केलेला हा प्रयत्न नियमाप्रमाणे मान्य झाला तर एक नवा विश्वविक्रम त्याच्या नावावर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याआधी कार्तिकने एका मिनिटात सर्वाधिक टाईल्स फोडण्याचा रेकॉर्ड ही केला होता.
मागील 5 वर्षांपासून करत आहे सराव
एका तासात सर्वाधिक पुश-अप्स मारण्याचा रेकॉर्ड करण्यासाठी मागील पाच वर्षांपासून मेहनत घेत होता. त्यासाठी दर दिवशी तो सहा तासांपेक्षा जास्त सराव करायचा. कार्तिकने ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल स्कालीचा रेकॉर्ड मोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हा डॅनियल स्कालीने त्याचा रेकॉर्ड कोणीही मोडू शकणार नाही असे प्रतिआव्हान दिले होते. त्यानंतर कार्तिकने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःला शारीरिक दृष्ट्या तयार केले आणि आता एका तासात तासात तब्बल 3 हजार 331 पुशअप्स मारून नवा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे. आता कार्तिकच्या या प्रयत्नांची व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासून रेकॉर्ड विश्व-विक्रम झाला आहे की नाही याची घोषणा होणार आहे.
हे देखील वाचा-
- Ishan Kishan : तबरेज-ईशानमध्ये मैदानात वाद, पुढच्याच बॉलवर चौकार ठोकत ईशानचं सडेतोड उत्तर, पाहा संपूर्ण VIDEO
- IND vs SA, Match Highlights : भारताचं मालिकेतील आव्हान जिवंत; तिसरा सामना 48 धावांनी जिंकला
- IPL सामन्यात फेकलेल्या एका बॉलमधून बीसीसीआयला मिळणार 49 लाख; एका सामन्यातून होणार 118 कोटींचा फायदा