मुंबई: आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज मुंबई इंडियन्सला कोलकाता नाईट रायडर्सचा मुकाबला करायचा आहे. रोहित शर्मा आणि गौतम गंभीरच्या संघांमधली ही लढाई एकप्रकारे आयपीएलची उपांत्य लढाईच ठरणार आहे.


आज रात्री आठ वाजता बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यातला विजेता संघच आयपीएलच्या फायनलमध्ये पुण्याला आव्हान देईल. दरम्यान, आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात मुंबईनं कोलकात्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे.

दुसरीकडे रायझिंग पुणेनं 'क्वालिफायर वन' सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करून आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक मारली.

या फायनलमध्ये पुण्याला आव्हान देणारा प्रतिस्पर्धी संघ कोणता असेल, या प्रश्नाचं उत्तर आज रात्री आठ वाजता बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर मिळणार आहे.

आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज मुंबई इंडियन्सना कोलकाता नाईट रायडर्सचा मुकाबला करायचा आहे.