Prithvi Shaw Sapna Gill Case : क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इंफ्लुएंसर सपना गिल प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले की पृथ्वी शॉने सपना गिलवर केलेल्या आरोपांमध्ये पुरेशी तथ्ये आहेत, या प्रकरणातील आरोपपत्राचा अभ्यास करू इच्छितो, परंतु या टप्प्यावर शॉने सुरू केलेली कार्यवाही रद्द करण्यास इच्छुक नाही. सपना गिलने पृथ्वी शॉविरुद्ध सुरू केलेली कारवाई रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. सपना गिलने या प्रकरणी एफआयआर (फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट) रद्द करण्यासाठी आधी कोर्टात धाव घेतली होती. पृथ्वी शॉचा मित्र आशिष यादवने सपना गिल आणि त्याच्या मित्रांविरोधात एफआयआर दाखल केला होता.

याचिका आम्ही फेटाळणार नाही

सपना गिलने अलीकडेच मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात क्रिकेटपटू पृथ्वी शॉने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एसएम मोडक यांच्या खंडपीठाने गिल यांच्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला आणि म्हटले की, आम्ही ती फेटाळणार नाही. न्यायमूर्ती कोतवाल यांनी गिलच्या वकिलाला ट्रायल कोर्टात डिस्चार्ज याचिका दाखल करायची आहे की नाही याबाबत सूचना घेण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती कोतवाल म्हणाले की, तुम्हाला डिस्चार्जसाठी जावे लागेल, आम्ही रद्द करणार नाही. एफआयआरमध्ये स्पष्टपणे काही गुन्ह्यांचा उल्लेख आहे, जे तुमच्याविरुद्ध काही सामग्री असल्याचे सूचित करते.

कोर्ट आरोपपत्राचा अभ्यास करणार 

खंडपीठाने अतिरिक्त सरकारी वकील जे.पी. याज्ञिक यांना आरोपपत्राची प्रत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आधी आरोपपत्राचा अभ्यास करू. खंडपीठाने या याचिकेची सुनावणी 3 एप्रिलपर्यंत तहकूब केली.

काय आहे सपना गिल-पृथ्वी शॉ प्रकरण?

ही बाब 15 फेब्रुवारी 2024 ची आहे. सपना गिल आणि तिच्या मैत्रिणींनी पृथ्वी शॉला मुंबईतील सांताक्रूझ भागातील एका रेस्टॉरंटमध्ये पाहिले आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा झाली. मात्र, मित्रांसोबत असलेल्या शॉने तसे करण्यास नकार दिला. यानंतर दोन्ही गटात हाणामारी झाली. पृथ्वीचा मित्र आशिष यादवने आरोप केला की, प्रथम शॉ घेऊन जाणाऱ्या कारवर बेसबॉल बॅटने हल्ला करण्यात आला, त्यानंतर आरोपींनी कारचा पाठलाग केला आणि पैसे न दिल्यास खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. गिलने हे आरोप फेटाळले असले तरी आशिष यादवच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी काही जणांना अटक केली. गिलने नंतर शॉ आणि काही पोलिसांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

इतर महत्वाच्या बातम्या