नवी दिल्ली: पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना प्राधान्य मिळालं पाहिजे, यासाठी टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूंनी पुढाकार घेतला आहे. टीम इंडियाचा एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी, कसोटी कर्णधार विराट कोहली आणि फलंदाज अजिंक्य रहाणेने आपल्या जर्सीवर आईच्या नावाची जर्सी परिधान केली आहे.

स्टार प्लसने 'नई सोच' या अभियानाचे आयोजन केले आहे. या अभियानाअंतर्गत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील स्टार क्रिकेटपटूंनी प्रचारासाठी आपल्या जर्सीवर वडिलांच्या नावाऐवजी आईच्या नावाचा वापर केला आहे. कंपनीने यासाठी बीसीसीआयसोबत विशेष करारही केला आहे.

या कॅम्पेनअंतर्गत या तिन्ही खेळाडूंना आपल्या जर्सीवरील आईच्या नावाच्या वापरासंबंधी विचारले असता, यावर धोनीने म्हणाला की, ''गेल्या अनेक दिवसांपासून मी माझ्या वडिलांच्या नावाचा वापर करत होतो, त्यावेळी अशाप्रकारचा प्रश्न कधीच विचारण्यात आला नाही.''

तर याच प्रश्नावर विराट कोहलीने आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील यशाचे सर्व श्रेय आपल्या आईला दिले. तो म्हणाला की, ''मी माझ्या आईमुळे जीवनात यशस्वी आहे. मी जितका कोहली आहे, तितका सरोजही आहे.''

हा प्रश्न अजिंक्य रहाणेला विचारला असता, त्याने आपल्या वडिलांचे नाव उंचावण्याचे सर्वच सांगतात, पण मला माझ्या आईचे नाव उंचावणे महत्त्वाचे वाटत असल्याचे, त्याने सांगितले.

धोनी आपल्या आईबद्दल काय म्हणाला?

विराट आपल्या आईबद्दल काय म्हणाला?



अजिंक्य रहाणे आईबद्दल काय म्हणाला?