बर्थ डे बॉय कॅप्टन कूल धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसीचे तीन मोठे टूर्नामेंट जिंकले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007चा टी 20 विश्व चषक, 2011 सालातील एक दिवसीय सामन्यांचा विश्व चषक जिंकला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुरेश रैनाने धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, कॅप्टन कूलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत धोनी बासरी वाजवताना पाहायला मिळत आहे. ''येणाऱ्या प्रत्येक वर्षात तुझी उत्तम कामगिरी आणि भरभराट होवो हीच शुभेच्छा''
बिग बी अमिताभ बच्चन यांनीही धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. ''हॅपी बर्थडे एमएस''
आयसीसीनेही धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आयसीसीच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून शुभेच्छा दिल्या आहेत. ''सर्वकाळातील महान कर्णधार, उत्तम फलंदाज, आणि उत्कृष्ट विकेटकीपर महेंद्र धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.''
सेहवागनेही कॅप्टन कूलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे, सेहवागने मिश्किल अंदाजात शुभेच्छा देताना धोनीच्या 'हॅलिकॉप्टर शॉट'चा संदर्भ देऊन 7 जुलै हा दिवस 'राष्ट्रीय हॉलिकॉप्टर दिवस' म्हणून घोषित करण्याची मागणीच केली आहे. सेहवागने आपल्या ट्विटमध्ये ''वाढदिवसाच्या शुभेच्छा, आप अनहोनी को होनी करते रहो,'' अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.
लंडनमधील गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर सचिन तेंडुलकर विश्रांती घेत आहे. मात्र, सचिनने ट्विटरवरून धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. ''वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष तुझ्यासाठी चांगले आणि आनंद देणारे असो,'' असे सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
धोनीच्या जुन्या सहकार्यांपैकी सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्यासोबतच बॉलीवूड अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांनीही धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी आज वयाच्या 35 व्या वर्षात पदार्पण करत आहे. धोनीच्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयचे आध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यापासून ते त्याचे सर्व सहकारी आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -