मुंबई : झिम्बाब्वे दौऱ्यातील एक दिवसीय सामन्यांमध्ये 2-1 असा विजय मिळवल्यानंतर एका निवांतक्षणी आराम घेत असताना, त्याला अनोखी मेजवानी मिळाली. तो आराम करीत असलेल्या हॉटेलमध्ये त्याचा लकी क्रमांक असलेल्या 7 क्रमांक लिहलेली कॉफी त्याला दिली.
धोनीने यासंदर्भात तत्काळ ट्विट करून याची माहिती दिली. या ट्विटवरून त्याने ही कॉफी बनवणाऱ्यांचे आभारही मानले आहेत. या कॉफीचे वैशिष्ट्य़ म्हणजे ही कॉफी बनवून त्यात धोनीचा लकी नंबर 7 तयार करण्यात आला आहे.
https://twitter.com/msdhoni/status/745892660506988544
धोनीचा लकी नंबर 7 असून त्याचा जन्म 7 जुलै 1981 रोजी झाला. तसेच त्याच्या क्रिकेट जर्सीवरील क्रमांकही 7 आहे. इतकेच नव्हे तर त्याने आजपर्यंत ज्या गाड्या खरेदी केल्या त्याचा क्रमांकही 7 आहे.