रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 65 किलो वजनी गटाच्या कुस्तीत मंगोलियाच्या गांझोरिगला पराभवाला सामोरं जावं लागलं. पण त्यानंतर नाराज झालेल्या मंगोलियाच्या दोन कुस्ती प्रशिक्षकांनी थेट मॅटवर जाऊन आपला निषेध नोंदवला.

 

निषेध नोंदवण्यासाठी त्यांनी मॅटवर थेट आपल्या अंगावरची कपडे काढून नाराजी व्यक्त केली. कांस्यपदकाच्या या लढतीत गांझोरिगला उझबेकिस्तानच्या इख्तियोर नावरुझोव्हकडून हार स्वीकारावी लागली. खरं तर अटीतटीच्या या सामन्यात दोन्ही पैलवानांनी जबरदस्त खेळ केला.

 

हा सामना संपल्यानंतर मंगोलियाचे प्रशिक्षक विजयाचा आनंद साजरा करु लागले. पण पंचांनी उझबेकिस्तानच्या पैलवानाला विजयी घोषित केल्यानंतर मंगोलियाच्या दोन्ही प्रशिक्षकांना आपला राग अनावर झाला आणि त्यांनी थेट आपली कपडे काढून पंचांच्या या निर्णयाचा विरोध केला.