मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू मोहम्मद कैफने क्रिकेटच्या सर्व  फॉरमॅट्समधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. मोहम्मद कैफने फलंदाजीबरोबरच दमदार क्षेत्ररक्षण करत भारतीय संघासाठी अनेकदा मोलाची कामगिरी केली.

‘इंग्लंडविरुद्ध 16 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारताने नेटवेस्ट मालिकेत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात माझाही सहभाग होता. म्हणूनच मी निवृत्तीची घोषणा करण्यासाठी 13 जुलै हा दिवस निवडला,’ असं ट्वीट कैफने केलं आहे.


इंग्लंडविरुद्ध 2002 साली झालेल्या नेटवेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये कैफने 87 धावांची नाबाद खेळी करुन भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. याच विजयानंतर कर्णधार सौरव गांगुलीने टी-शर्ट भिरकावत जल्लोष केला होता.

मोहम्मद कैफने 2002 साली भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलं. कैफने आपल्या कारकीर्दीत एकूण 13 कसोटी आणि 125 वनडे सामन्यांत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये आपला विशेष ठसा उमटवण्यात कैफ अपयशी ठरला होता. त्याने कसोटीमध्ये 40.31 च्या स्ट्राईक रेटने 624 धावा केल्या. तर वन डेमध्ये कैफने दोन शतके आणि 17 अर्धशतकांसह 2753 धावा केल्या.

दरम्यान, कैफ भारतासाठी 2006 साली आपला अखेरचा सामना खेळला होता.

ऐतिहासिक विजयाचा व्हिडीओ :