पत्नीसोबतचा फोटो शेअर करुन शमीच्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा!
एबीपी माझा वेब टीम | 02 Jan 2017 12:32 PM (IST)
मुंबई: सोशल नेटवर्किंग वेबसाइट ट्विटरवर पत्नीसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीच्या पेहरावावर काही कट्टरपंथीयांनी टीका केली होती. त्यानंतर शमीनं आता पुन्हा एकदा पत्नीसोबतचा नवा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. नववर्षाच्या शुभेच्छा देत शमीनं पत्नीसोबताच नवा फोटो शेअर केला आहे. शमीनं कवितेच्या माध्यातून नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “न साथी है, न हमारा है कोई. न किसी के हम है, न हमारा है कोई. पर आपको देख कर, कह सकते हैं एक प्यारा हमसफर है कोई. नववर्ष की शुभकामनाएं.” दरम्यान, शमीची पत्नी हसीन जहाँ हिच्या पेहरावावरुन कट्टरपंथीयांनी बरीच टीका केली होती. इतकंच नव्हे तर तिला हिजाब घालण्याचा फुकट सल्लाही त्यांनी दिला होती. त्यानंतर शमीनं ट्विटरवरुन आपल्या खास शैलीत उत्तर दिलं होतं.