मिताली राज महिला वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज
एबीपी माझा वेब टीम | 12 Jul 2017 05:03 PM (IST)
मुंबई : भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात आाला आहे. मिताली ही आंतरराष्ट्रीय महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. बुधवारी इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवल्या गेलेल्या महिला विश्व चषकातील सामन्यात मितालीने ही कामगिरी बजावली. हा मितालीचा 183 वा एकदिवसीय सामना होता. मितालीने इंग्लंडची माजी क्रीडापटू शार्लोट एडवर्ड्सचा विक्रम मोडित काढला आहे. एडवर्ड्सने 191 वनडे सामन्यांमध्ये 5 हजार 992 धावा ठोकल्या होत्या. ही धावसंख्या गाठण्यासाठी एडवर्ड्सला 180 डाव खेळावे लागले होते, मात्र मितालीने केवळ 164 डावातच ही मजल मारली.