...हा आहे साक्षी मलिकच्या स्वप्नातील राजकुमार!
सत्यव्रतने 2010 सालात झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत 100 किलो वजनी गटातून कांस्यपदकाची कमाई केली होती.
सत्यव्रत आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्त
नुकत्याच प्रकाशित झालेल्या मीडिया रिपोर्टनुसार साक्षी मलिक 2014 मधील कॉमनवेल्थ खेळात रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या सात्यव्रत कादिन याच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतही तिने आपल्या होणाऱ्या राजकुमाराचे नाव सांगण्यास नकार दिला, तरी तोही तिच्याप्रमाणे कुस्तीपटू असल्याचे यावेळी तिने सांगितले होते.
साक्षीने रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करून संपूर्ण देशाचे लक्ष्य आपल्याकडे वेधले होते.
रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केलेल्या साक्षी मलिकने मायदेशी परतताच आपण लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे तिच्या स्वप्नातील राजकुमार कोण आहे? याबाबत अनेकांना उत्सुकता लागून होती.