महाराष्ट्रात पाण्याची टंचाई असताना खेळपट्टी तयार करण्यासाठी लाखो लीटर पाण्याची नासाडी होते, त्यामुळे आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर व्हावेत, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयापुढे आली होती.
घझथ
उच्च न्यायालयानेही याचिकेत तथ्य असल्याचं नमूद केलं आणि 30 एप्रिलनंतरचे महाराष्ट्रातील नियोजित सामने इतर राज्यात खेळवण्याचे आदेश दिले. याच निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं आहे.