पुणे वनडे सामन्याच्या तिकीटांची अवघ्या 12 दिवसात विक्री!
एबीपी माझा वेब टीम | 28 Dec 2016 11:39 PM (IST)
पुणे: भारत आणि इंग्लंड संघांमधल्या पहिल्या वन डे सामन्याची सगळी तिकिटं बारा दिवसांतच विकली गेली असल्याचं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं जाहीर केलं आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियममध्ये 15 जानेवारीला होणाऱ्या सामन्यानंच या वन डे मालिकेच्या लढाईला तोंड फुटणार आहे. 37 हजार क्षमतेच्या या स्टेडियममधला हा दुसराच वन डे सामना असणार आहे. याआधी 13 ऑक्टोबर 2013 रोजी या मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलियामधला वन डे सामना कांगारूंनी 72 धावांनी जिंकला होता.