ऑस्ट्रेलिया आणि भारत 'अ' संघांमधला तीनदिवसीय सराव सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियानं पाच बाद 327 धावांची मजल मारली.
कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि शॉन मार्शने तिसऱ्या विकेटसाठी 156 धावांची भागीदारी रचून त्यात मोलाचं योगदान दिलं. स्मिथने 12 चौकार आणि एका षटकारासह 107 धावांची, तर शॉन मार्शने 11 चौकार आणि एका षटकारासह 104 धावांची खेळी उभारली. पीटर हॅण्डसकोम्बनेही 45 धावांची खेळी रचून, कसोटी मालिकेची उत्तम पूर्वतयारी करून घेतली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेचा भाग म्हणूनच उभय संघांमध्ये सराव सामना खेळवण्यात येत आहे.