यंदा ऑस्ट्रेलियन ओपनदरम्यान झालेल्या उत्तेजक तपासणीत शारापोव्हानं मेल्डोनियम या प्रतिबंधित औषधाचं सेवन केल्याचं स्पष्ट झालं होतं. आपल्याकडून नजरचुकीनं मेल्डोनियमचं सेवन झाल्याचा शारापोव्हाचा दावा आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशननं मान्य केला, मात्र नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी शारापोव्हावर दोन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली.
या निर्णयाविरोधात शारापोव्हानं क्रीडा लवादाकडे अपील केलं होतं. त्यावर 18 जुलैपर्यंत सुनावणी अपेक्षित होती. मात्र, कायदेशीर प्रक्रियांमध्ये वेळ जाणार असल्यानं ही सुनावणी दोन्ही पक्षांच्या सहमतीनं 19 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.