Majha Katta : Avinash Sable: ''आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू जसे मेडल जिंकतात, तसं माझंही लहानपणापासून आपणही मेडल जिंकावं हे स्वप्न होतं. मी खेळत असलेली स्पर्धा ही कठीण आहे. यात अडथळेही आहेत, वॉटर जम्प आहे. इतके सर्व अडथळे पूर्ण करून आपल्याला शर्यत पूर्ण करावी लागते'', असं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) नवा इतिहास घडवत स्टीपलचेस शर्यतीत भारताला रौप्यपदक मिळून देणारा धावपटू अविनाश साबळे म्हणाला आहे. 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित प्रेरणादायी माझा कट्टामध्ये बोलताना तो असं म्हणाला आहे.
एबीपी माझा कट्टावर बोलताना अविनाश साबळे म्हणाला आहे की, ''या स्पर्धेत 1996 पासून केनियाशिवाय कोणीही पदक जिंकलं नव्हतं. सगळे असेच म्हणत होते की, या स्पर्धेत पदक जिंकणे खूप अवघड आहे. मात्र मी असा विचारच केला नाही की, हे अवघड आहे. यासाठी मला माझे प्रशिक्षक आणि इतर सर्वानी खूप मदत केली.'' तो म्हणाल की, ''स्पर्धा सुरू होताच माझ्या मनात होतं की, पदक तर जिंकायचं आहेच आणि त्यासाठी केनियाच्या तीन खेळाडूमधील एकाला तरी हरवावं लागेल. स्पर्धा सुरू होताच मी पहिल्या लॅपमध्ये मी सुरुवात केली, जी 400 मीटरची होती. त्यामध्ये मी समोर आलो. त्यावेळी अचानक माझ्यासमोर केनियाच्या धावपटू आला. ज्यामुळे स्पर्धा आणखी रंगली.''
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेबद्दल बोलताना तो म्हणाला, मी 2500 मीटरपर्यंत चौथ्या क्रमांकावर होतो. त्यावेळी मी पाहत होतो की, माझ्या सोबतचे धावपटू थकले आहे का, यानंतर मी पुढे निघू शकलो असतो. मी माझी ताकद वाचून ठेवली होती. कारण मला शेवटी पुढे निघायचे होते. ज्यावेळी फक्त 500 मीटर वाचले होते. तेव्हा मी ठरवलं, हीच वेळ आहे. आता निघावं लागेल. त्यावेळी मी दुसऱ्या क्रमांकावर आलो. मात्र शेवटच्या लॅपमध्ये मी खूप प्रयत्न केला. मात्र काही मायक्रो सेकंदमुळे माझं सुवर्णपदक हुकलं आणि मला रौप्यपदक मिळालं. मला असं वाटतं मी थोडे आणखी प्रयत्न केले असते तर सुवर्णपदक जिंकलं असतं. मात्र मी समाधानी आहे.
संबंधित बातम्या:
पहिल्या मॅरेथॉनमध्ये 100 रुपये बक्षीस मिळवलं, बीड ते बर्मिंगहॅम अडथळ्याच्या शर्यतीची अविनाश साबळे याची यशोकहाणी
Avinash Sable Wins Silver : आयुष्यातील अडथळ्यांची शर्यत पूर्ण करणारा बीडचा अविनाश साबळे