रांची: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे आणि टी 20 मालिकेनंतर, टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. मात्र कसोटीतून निवृत्ती घेतलेला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या रांचीतील घरी मस्त सुट्ट्या एन्जॉय करत आहे.


धोनी आपल्या दोन कुत्र्यांना खास ट्रेनिंग देत आहे. त्याबाबतचा व्हिडीओ धोनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

धोनी त्याच्या कुत्र्यांना उंच उडी, गोल रिंगमधून उडी असे विविध प्रकार शिकवताना या व्हिडीओमध्ये दिसतं.

धोनीने व्हिडीओसोबत कॅप्शन लिहिलं आहे. “झोया प्रशिक्षण घेत आहे आणि लिली त्याला प्रोत्साहन देत आहे” असं धोनीने म्हटलं आहे.
धोनीने यापूर्वी अनेकवेळा कुत्र्यासोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यावरुन त्याचं प्राणीप्रेम दिसून येतं.




भारत- श्रीलंका कसोटी 

दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला उद्या म्हणजेच 16 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. कोलकात्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात येईल.